लासुर येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा

 लासुर येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा

 लासुर ता.चोपडा दि.६(वार्ताहर)-येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पत्रकार दिनाचे औचित्य साधत लासुर ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि गावातील पत्रकारांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच नर्मदाबाई भिल होते. तर कार्यक्रमास उपसरपंच अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

  पत्रकार हा लोकशाहीच्या चौथा आधारस्तंभ असून पत्रकारिता करत असताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते असे प्रतिपादन उपसरपंच अनिल पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केले.सदर कार्यक्रमास पोलीस पाटील जितेंद्र पाटील,ग्रा पं सदस्य विकास वाघ,रामचंद्र बारेला,उमेश माळी,विवेक कोळी तसेच विक्रम जावरे,शकील अली फकीर,प्रकाश कोठारी,ओमप्रकाश पालीवाल,वसंत पाटील,सोमनाथ सोनार,सुधीर पाटील, लक्ष्मण पाटील,अशोक पाटील,देविदास मगरे,संदीप महाजन,संजय पाटील,राहुल पाटील,वना पवार,बापू महाजन,संजय महाजन,हेमराज लोहार,पत्रकार श्रीराम पालीवाल,देवीलाल बाविस्कर,आत्माराम पाटील,अजय पालीवाल,परेश पालीवाल, ह.भ. प बापू चौधरी,वितरक रमेश महाजन यांसह सर्व संस्थांचे पदाधिकारी,ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार बांधव तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने