चोपड्यात अन्य दोन दवाखाने सुरू गोरगरीब रुग्णांकडून आमदारांचा" जयजयकार"

 

चोपड्यात अन्य दोन दवाखाने सुरू  गोरगरीब रुग्णांकडून आमदारांचा" जयजयकार"

चोपडा,दि.७(प्रतिनिधी) शहरात नव्याने चक्क दोन दवाखाने उघडल्याने गोरं गरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला.आमदार सौ. लताताई सोनवणे यांनी  मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून 15 वा वित्त आयोग अंतर्गत  सुंदरगढी व मल्हारपुरा या दोन ठिकाणी शहरी आरोग्य वर्धीनी केन्द्र तथा आयुष्मान आरोग्य  केंद्रांचा शुभारंभ करुन  गरजवंत रुग्णांचा कायमचा प्रश्न निकाली निघाल्याने झोपडपट्टी भागातील रहिवाशांनामध्ये  आनंदाला उधाण आले आहे.
  आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांचे शुभ हस्ते व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे प्रमुख उपस्थितीत  ह्या रुग्ण केंद्राचे उद्घाटन काल रोजी करण्यात आले. या केंद्रामुळे शहरी भागातील गोरगरीब ,झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत  आरोग्य केंद्र स्थापन करून कार्यान्वित करण्यात आले आहेत. या आरोग्य केंद्रामध्ये बाह्य रुग्ण सेवा,मोफत औषधोपचार,मोफत चाचण्या ,गर्भवती मातांची तपासणी ,लसीकरण , ई सेवा घराजवळच उपलब्ध होणार असून  सेवांचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ  घ्यावा  असे आवाहन  आमदार महोदयांनी  केले आहे. 

रुग्णांलय उद्घाटन  सोहळ्यास तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रदीप लासूरकर ,वैद्यकीय अधिकारी डॉ मयुरेश जैस्वाल, डॉ महेश लाडे,बाजार समिती सभापती  नरेंद्र पाटील ,माजी उपसभापती  एम. व्ही .पाटील, राजेंद्र पाटील, विकास पाटील, कैलास बाविस्कर , प्रकाश राजपूत , विजय वाघ, विकास पाटील तसेच  शिवसेना पदाधिकारी,आरोग्य कर्मचारी व आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी नदीम शेख व गजानन करंदीकर ,दिनेश बारेला आदींनी प्रयत्न केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने