आस शिक्षक संघटनेकडून भरत शिरसाठ यांना राज्यस्तरीय अध्यापक पुरस्कार

 आस शिक्षक संघटनेकडून भरत शिरसाठ यांना राज्यस्तरीय अध्यापक पुरस्कार

  चोपडा दि.०३(प्रतिनिधी) नुकतेच नादेड जिल्हा येथे आस शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना महाराष्ट् राज्य वतीने शैक्षणिक प्रोत्साहन सोहळा संपन्न झाला.यावेळी संम्मेलनाचे उद्‌घाटन मा.आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते झाले. विशेष प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर जिल्हाधिकारी मा.पाडूरंग बोरगांवकर,मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नादेड मा.मिनल करनवाल,शिक्षण संचालक डॉ. दत्तात्रय मठपती,शिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प.नादेड डॉ.सविता बिरगे,मा.युवराज पोवाडे राज्याध्यक्ष आस संघटना हे उपस्थित होते.

राज्यभरातील ३५ जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांना अध्यापक पुरस्कार देवून गौरवण्यात आलें.यावेळी जळगांव जिह्यांतून एकमेव पुरस्कार चोपडा तालुक्यातील विरवाडे न्यू.प्लॉट जि.प शाळेचे मुख्याध्यापक भरत भिमराव शिरसाठ यांना मा.आमदार बालाजी कल्याणकर व अपर जिल्हाधिकारी नादेड मा.पाडूरंग बोरगांवकर यांच्या हस्ते राज्यस्तरीय अध्यापक पुरस्कार मोमेंट,प्रमाणपत्र, शाल श्रीफळ देऊन गौरवण्यात आले.

    सदर कार्यक्रमात संजय श्रीपत साळुंखे उपशिक्षक वराड यांचा सेट परीक्षा पास व पीएचडीस नंबर लागला म्हणून विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी अकबर तडवी, प्रविण सत्तेसा, संजय साळुंखे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने