प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

 प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा



अमळनेर दि.२६(प्रतिनिधी)राष्ट्रीय सेवा योजना विभाग  प्रताप महाविद्यालय अमळनेर आणि मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस प्रताप महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय अमळनेर तर्फे मतदार दिनानिमत्त  रांगोळी ,  निबंध , वक्तृत्व घोषवाक्य , लघु नाट्य, पोस्टर्स मेकिंग अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या .

या स्पर्धांमध्ये प्रताप महाविद्यालय अमळनेर, पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, धनदाई महाविद्यालय मधील विद्यार्थ्यानी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. आजच्या कार्यक्रमात या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात प्रांत महादेव खेडकर साहेब यांनी विद्यार्थ्यांना मतदार दिनाविषयी मार्गदर्शन केले आणि  मतदान करणे हा प्रत्येकाचा हक्क आणि कर्तव्य आहे असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे यांनी भूषविले.  सदर कार्यक्रमाला  प्राचार्य डॉ. ए बी जैन, तहसीलदार श्री सुराणा साहेब, नायब तहसीलदार श्री ढोले साहेब, अमळनेर येथील निवडणूक शाखा अधिकारी श्री नितीन ढोकणे साहेब,प्रा. सुनील राजपूत आणि बहुसंख्य प्राध्यापक आणि विध्यार्थी उपस्थित होते. पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय आणि प्रताप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून मतदार जनजागृती विषयी संदेश दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. हेमंत पवार, डॉ. भरत खंडागळे आणि आभार प्रदर्शन प्रा. भाग्यश्री जाधव यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने