संजय गांधी निराधार समिती बैठकीत ४९७ प्रकरणे मंजूर

 संजय गांधी निराधार समिती बैठकीत ४९७ प्रकरणे मंजूर

चोपडा दि.११(प्रतिनिधी)संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक नवीन प्रशासकीय इमारत  येथे  समितीच्या अध्यक्षा आमदार सौ.लताताई चंद्रकांतजी सोनवणे यांच्या उपस्थितीत  आज दि.११/०१/२०२४  रोजी होऊन ४९७ प्रकरणे मंजूर करण्यात आले आहेत.  

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत  विधवा , परित्यक्ता,दिव्यांग, वृध्द, निराधार अशा निकडवंतांचे अर्ज मंजुर करण्यात आले .याप्रसंगी समिती सचिव तहसीलदार भाऊसाहेब थोरात, सदस्य नायब तहसीलदार बाबळे, ,गटविकास अधिकारी रमेश वाघ, मंगलाताई पाटील,राजेंद्र पाटील,सौ.मनिषाताई किशोर पाटील, कुणाल पाटील,संजय शिरसाठ,संतोष आहिरे,सौ.योगिताताई न्याहळदे व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने