विरवाडे येथे गणतंत्र दिवसा निमित्त मोफत महा आरोग्य शिबिर संपन्न

 विरवाडे  येथे गणतंत्र दिवसा निमित्त मोफत महा आरोग्य  शिबिर संपन्न

विरवाडे ता. चोपडा दि.२८(प्रतिनिधी) : येथे 26जानेवारी रोजी दुपारी तीन ते सात वाजेपर्यंत, ग्रामपंचायत कार्यालय येथे चोपडा येथील साईबाबा क्लीनिक चोपडा येथील डॉक्टर सचिन मुरलीधर काटे एमबीबीएस एमडी मेडिसिन यांच्यासह वैद्यकीय पथकाने महाआरोग्य शिबिर घेण्यात आले .त्या शिबिरात 210 रुग्णांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तपासणी करून निदान झाल्यावर मोफत उपचार व मेडिसन सोबत देण्यात आले त्यात, हृदयरोग, मधुमेह ,रक्तदाब, दमा ,अस्थमा ,श्वसनाचे विकार ,छाती विकार, पोटाचे, मेंदूचे आजार, संधिवात ,साथीचे आजार असे विविध प्रकारचे आजाराची तपासणी व उपचार करून मोफत औषधी देण्यात आली. 

   तपासणीनंतर रुग्णांना लागणारी औषधी सागर  पाटील ,कल्पेश पाटील यांनीवाटप केली. विशेष  डॉक्टरसह वैद्यकीय पथकाचे  सरपंच विशाल म्हाळके  व ग्रापंचायत सदस्य यांनी मोफत सेवा दिल्याबद्दल आभार मानले.तसेच वैद्यकीय पथकाने देखील सरपंच विशाल म्हळके व ग्रामपंचायत सदस्य यांनी योग्य मार्गदर्शन व सहकार्य केल्याने त्यांचे आभार मानले.तसेच वेळीच निदान होऊन उपचार झाल्याने रुग्णांनी आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने