चोपडा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा बेमुदत संप.. विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन

चोपडा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा बेमुदत संप.. विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन


चोपडा दि.४(प्रतिनिधी) तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी विविध मागण्यांसाठी  बेमुदत संप पुकारला  असून आज दि.४/१/२०२४ रोजी  संघटनेमार्फत  विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना देण्यात आले आहे.अनेक वेळा आंदोलने करून सुद्धा शासन  मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार हे बेमुदत संपावर उतरले आहेत
स्वस्त धान्य दुकानदारांना ५० हजार रुपये महिना मानधन देण्यात यावे. व इष्टकां प्रमाणे माल मिळवा.अशा विविध मागण्यांकरीता राज्यभरअखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे व ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डीलर्स फेडरेशन नवी दिल्लीसह विविध संघटनांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्याअनुषंगाने चोपडा शाखेतमार्फत तालुकाध्यक्ष  विकास पाटील व मधुकर राजपूत यांच्या नेतृत्वाखाली बंद पुकारण्यात आला असून १३४ दुकानदारांनी सहभाग नोंदविला आहे
निवेदन प्रसंगी विकास काशिनाथ पाटील, मधुकर अभिमन्यू राजपूत, महेंद्र निळकंठ महाजन, चित्रा प्रकाश चौधरी, पूनमचंद जयचंद भावसार,महेश पांडुरंग शिरसाट,अशोक राजाराम बाविस्कर, महेंद्र धनगर,अमृत कोळी,मोहनलाल जैन, रशीद तडवी ,संजय पाटील, सुनंदाबाई ज्ञानेश्वर धनगर ,राजू तडवी,  , अनिल लीलाधर कोळी, पी.जी जैन , शैलेश जैन,अशोक जैन,दशरथ बाविस्कर,एन एम जैन,  सुरेखा बाविस्कर, सुनंदाबाई ज्ञानेश्वर धनगर , रविंद्र महाजन,बि.ज.शेलकर ,  आदी स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने