शिक्षक नेते आर एच बाविस्कर यांचा ग. स. तर्फे सत्कार

 शिक्षक नेते आर एच बाविस्कर यांचा ग. स. तर्फे सत्कार

चोपडा दि.२९(प्रतिनिधी)जिल्ह्याचे शिक्षक नेते, माध्यमिक पतपेढी, जळगांव चे माजी अध्यक्ष आर एच बाविस्कर यांनी आपल्या सेवाकाळात शिक्षक संघटनेमध्ये शिक्षण क्षेत्रातील समस्यांच्या निराकरणासाठी भरीव कामगिरी करून जे योगदान दिले त्याबद्दल त्यांना ""महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी अर्थात TDF"" चा मानाचा ""जीवन गौरव सन्मान"" नुकताच शिर्डी येथील TDF च्या नाशिक विभागीय कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानाने प्रदान करण्यात आला.

 त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार ग. स. सोसायटी, जळगांव चे अध्यक्ष उदय मधुकर पाटील, उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, सहकार गटाचे गटनेते अजबसिंग पाटील, संचालक भाईदास पाटील, महेश पाटील, रागिणीताई चव्हाण,नगर परिषद, पारोळ्याचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण साहेब, पारोळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, संचालक व्ही एच पाटील साहेब,अजय देशमुख, योगेश सनेर, मंगेश भोईटे, योगेश इंगळे, ए टी पवार, निलेश पाटील आदिंच्या उपस्थितीत करण्यात आला.*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने