महाजन क्लासेसमध्ये १० वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्ग संपन्न

 महाजन क्लासेसमध्ये १० वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्ग संपन्न



चोपडा दि.१०(प्रतिनिधी): येथील महाजन क्लासेस तर्फे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्ग नुकताच संपन्न झाला यात वडती विद्यालयाचे शिक्षक  जगदीश पाठक यांनी  विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून गुणवत्ता यादीत कसा येता येईल याविषयी भरीव मार्गदर्शन केलं.

प्रयत्न हे मानवी यशाचे गमक आहे त्या उक्तीनुसार प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न करणे गरजेचे आहे यासाठी चोपड्यातील विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र व ज्ञानाचा दिवा दाखवण्यासाठी अनेक वर्षापासून महाजन क्लास प्रयत्नशील आहे . इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना नाशिक विभागात मेरिटमध्ये कसे  येतात येईल त्यासाठी दरवर्षी   क्लासेसचे संचालक दीपक महाजनसर   मेहनत घेत असतात.विद्यार्थ्यांना तज्ञ  शिक्षकांचे मार्गदर्शन  शिबिर आयोजित करीत असतात त्याचाच भाग म्हणून यंदा वडती विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक श्री जगदीश पाठक यांचे मार्गदर्शन वर्ग आयोजित केला होता त्यामध्ये श्रीपाठक यांनी बोर्डाच्या पेपर मधील कच्चे धागे  विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिले. पेपर कसा सोडवावा, अक्षराचे महत्व, अवघड प्रश्न सोपा करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष करून दाखवले.तसेच विद्यार्थ्यांना टाईम मॅनेजमेंटची सुद्धा महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास वाढविला. पाठक सरांच्या सत्कार श्री महाजन सरांनी करून  कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने