चोपडा आगारास खासदार रक्षाताई खडसे यांची भेट

 चोपडा आगारास खासदार रक्षाताई खडसे यांची भेट

चोपडा दि.२४ ( प्रतिनिधी) चोपडा रावेर मतदार संघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी नुकतीच चोपडा आगारास भेट देली. "हिंदुहद्य सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक" अभियानात दुसर्या फेरी अखेर महाराष्ट्रात 80 गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळविल्याने खासदार रक्षाताई खडसे यांनी आगार प्रमुख महेंद्र पाटील व कर्मचार्यांचा सत्कार केला.चोपडा आगाराच्या झालेला काया पालट, आगाराचे नियोजन याबाबत त्यांनी कौतुक केले व आगारातील वाहनांची संख्या,लांब पल्ला, मध्यम पल्ला व मुक्कामाच्या फेर्यांची माहिती घेवुन संपूर्ण आगाराची पाहणी करून कर्मचार्यांशी हितगुज साधले.यावेळी भाजपाचे राकेश पाटील, पं स माजी सभापती आत्माराम म्हाळके,जि प सदस्य गजेंद्र सोनवणे, तालुका अध्यक्ष चंद्रशेखर पाटील,शहर अध्यक्ष नरेंद्र पाटील,मगन बाविस्कर, धनंजय पाटील, लक्ष्मण पाटील, आगारातील डी डी चावरे,संजय सोनवणे,चंद्रभान रायसिंग,भगवान नायदे,शाम धामोळे,अशोक पाटील सह कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने