आमदारांकडून खेडीभोकर तापी पुलाच्या बांधकामाची पाहणी..काम वेळेत व उत्कृष्ट करण्याची संबंधितांना सूचना

 आमदारांकडून खेडीभोकर तापी पुलाच्या बांधकामाची पाहणी..काम वेळेत व उत्कृष्ट करण्याची संबंधितांना सूचना

चोपडा दि.२४(प्रतिनिधी) चोपडा तालुक्याच्या भाग्य विधात्या आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी कार्यसम्राट आमदार आण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे या उभयतांनी  खेडीभोकर  गावाजवळील तापी नदीवरील १७२ कोटीच्या पुलाच्या  बांधकाम  पाहणी केली असून ठेकेदार व इंजिनिअर यांना काम उत्कृष्ट व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी आमदारांनी पूलाच्या बांधकाची लेव्हल, पिल्हर व  दोन्हीही बाजुने सुरु असलेले रस्त्याचे खोदकाम व स्टील टाकून बांधकाम पुलाच्या आजुबाजुला असलेले वळण अशी  चौफेर पाहनी करून  ठेकेदार ,इंजिनियर आणि बांधकाम स्पेशालिस्ट कामगार यांच्याशी  सविस्तर चर्चा करुन  कामात कुठेही दिरंगाई होता कामा नये आणि लवकरात लवकरच  ११ महिन्याच्या आत काम पुर्ण करावे अशा सूचना दिल्यात.या पूलामुळे चोपडा -जळगाव जाण्यासाठी अवघे ४५मिनिटै लागतील त्यामुळे प्रवाशाकरीता  हा रस्ता सोयीचा होणार आहे.

याप्रसंगी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री नरेद्रभाऊ पाटील, संचालक गोपाल  पाटील ,विजय पाटील, किरण देवराज ,रावसाहेब पाटील सौ .कल्पनाताई पाटील , शिवराज  पाटील ,माजी उपसभापती एम व्ही पाटील, राजेद्र पाटील ,कैलास बाविस्कर .,फौजी नाना संदीप पाटील, प्रताप पाटील, गणेश पाटील, संरपच वाल्मिक कोळी ,संरपच अन्नु ठाकुर ,भरत भाऊसाहेब  तसेच  खेडीभोकर ,गोरगावले  परीसरातील ग्रामस्थ व शिवसैनीक  मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने