जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या शुभहस्ते बाल विवाह जन जागृती अभियानाचा शुभारंभ ..जिल्हाधिकारी कार्यालय व वर्ल्ड व्हिजन इंडिया आणि जिल्हा महिला बाल विकास विभागाचा संयुक्तिक उपक्रम

 

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या शुभहस्ते बाल विवाह जन जागृती  अभियानाचा शुभारंभ ..जिल्हाधिकारी कार्यालय व वर्ल्ड व्हिजन इंडिया आणि जिल्हा महिला बाल विकास विभागाचा संयुक्तिक उपक्रम


जळगाव,दि.२०(प्रतिनिधी ):
जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा महिला  बाल विकास विभाग कार्यालय आणि वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव या सामाजिक संस्थेच्या  संयुक्त विद्यमाने बाल विवाह थांबविण्यासाठी भव्य जनजागृती  रॅलीचा शुभारंभ  जिल्हाधिकारी  आयुष प्रसाद यांच्या हस्ते शुभ हस्ते नुकताच करण्यात आला.
या वेळी प्रथम इवाक कॅम्पियान चे उद्घाटनही  व "गुड़ टच ब्याड टच" या पुस्तकांचे विमोचन पार पडले. शिवाय 23 गावातील 35 बाल गटाच्या माध्यमातून  मुलांच्या बाल सरक्षणा बाबत एकून 20 मागनी पत्रे जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले
.



प्रारंभी जळगाव जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी डॉ. वनिता संगोट  यांनी व तसेच वर्ल्ड व्हिजन इंडिया  प्रकल्प अधिकारी जितेन्द्र गोरे   यांनी जिल्हाअधिकारी आयुष प्रसाद यांचे  पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यानंतर वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगावचे प्रकल्प अधिकारी जितेन्द्र गोरे यांनी या रॅलीला संबोधित करून
बाल विवाह थांबविण्यासाठी जिल्हा व धरणगाव तालुक्यातील संपूर्ण गावांमध्ये व शहरी भागात प्रचार रथ फिरवून जन जागृती अभियान करण्यात येत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी वर्ल्ड व्हिजन इंडियाचे कर्मचारी रतीलाल वळवी, अंकिता मेश्राम, विजेश पवार, स्वयम् सेवक वैष्णवी पाटील, आरती पाटील, रचना जाधव, जितेन्द्र पाटील  व धरणगाव तालुक्यातील 23 मधील बाल गट, 35 बाल गट सदस्य  सीडीपीओ व सी डब्लू सी चे कर्मचारी व वर्ल्ड व्हिजन चे कर्मचारी  उपस्थित  होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने