अशोक नगरातील ओंकारेश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा १३ डिसेंबरपासून

 

अशोक नगरातील ओंकारेश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा १३ डिसेंबरपासून


चोपडा,दि.१०(प्रतिनिधी)शहरातील नागलवाडी रोडवरील अशोक नगरातील श्री ओंकारेश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा ज्योतिषाचार्य आचार्य पं. अलोक महाराज  यांच्या शुभहस्ते होत आहे.
शोभायात्रा कार्तिक कृष्ण चतुर्दशी सोमवार दि.११/१२/२०२३ रोजी संध्याकाळी ४ वाजता शितलनाथ बाबा मठापासुन, निघणार असून शेवट मंदिर प्रांगणात होणार आहे.त्यानंतर मार्गशिर्ष शुक्ल प्रतिपदा बुधवार रोजी दि.१३/१२/२०२३रोजी
सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजे दरम्यान देवता स्थापन व जलाधिवास होईल. तर मार्गशिर्ष शुक्ल व्दीतीया गुरुवार दि. १४/१२/२०२३रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत
देवता हवन कार्यक्रम होईल.तसेच मार्गशिर्ष शुक्ल तृतीया शुक्रवार  दि.१५/१२/२०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता
प्राणप्रतिष्ठा व महाआरतीचा कार्यक्रम होईल.त्याचप्रमाणे
दि. १८/१२/२०२३, सोमवार रोजी वेळ संध्याकाळी ६ वाजता  महाप्रसाद भंडारा कार्यक्रम होणार आहे तरी या परमार्थिक सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन  आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने