शासकीय अभियंता सहकारी पतपेढीवर स्वाती नन्नवरे बिनविरोध

 शासकीय अभियंता सहकारी पतपेढीवर स्वाती नन्नवरे बिनविरोध


जळगाव,दि.३१(प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा शासकीय अभियंता सहकारी पतपेढीच्या महिला राखीव मतदारसंघातून स्वाती योगेश नन्नवरे यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली. स्वाती नन्नवरे या सार्वजनिक बांधकाम विभागात उपकार्यकारी अभियंता (उत्तर विभाग) म्हणून सेवारत आहेत.त्या चोपडा  धान्य गोडाऊन व्यवस्थापक योगेश्वर नन्नवरे यांच्या पत्नी आहेत त्यांच्या या बिनविरोध निवडीबद्दल त्यांचे  सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी.एच.पाटील यांनी काम पाहिले.

निवडून आलेल्या उमेदवारांची (संचालकांची) यादी पुढीलप्रमाणे सर्वसाधारण मतदार संघ (६ जागा): विजयी संचालक: चव्हाण सुभाष पंडित,पाटील कामेश सुनिल,पाटील कुलदिप राजेंद्र ,पाटील प्रमोद मधुकर,पवार हेमंत रविंद्र,तायडे चंद्रशेखर दामोदर

भ.ज.वि.ज.व विमाप्र मतदार संघ (जागा१) :राजपुत तुषार रामचंद्र

इ.मा.व. मतदार संघ (१ जागा) :पाटील सचिन भागवत

 अनुसूचित जाती जमाती मतदार संघ (जागा १): तायडे ब्रम्हानंद काशिनाथ

 महिला राखीव मतदार संघ  (जागा २): नन्नवरे स्वाती योगेश्वर,सुर्यवंशी आरती निलेश

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने