अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नाशिक, जळगाव व धुळे पथकाच्या चोपडयात धाडी.. लाखोंचा गुटखा जप्त ,४ दुकाने सील

 अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नाशिक, जळगाव व धुळे पथकाच्या चोपडयात धाडी.. लाखोंचा गुटखा जप्त ,४ दुकाने सील



चोपडा दि.७(प्रतिनिधी)  नाशिक, जळगाव व धुळे येथील अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांच्या पथकाने चोपडा शहरात  अनेक दुकानांवर धाडी टाकत लाखोंचा अवैध गुटखा साठा जप्त करत ४ दुकानांना सील ठोकण्यात आले आहे.शिवाय चौघांवर पोलिसात गुन्हा झाल्याने अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे 

 चोपड्यात आज  अन्न व औषध प्रशासनाचे  पथकाने अवैधरित्या गुटखा शोधण्यासाठी दाखल होत जळगाव, धुळे, नाशिक  असे तीन वेगवेगळे पथक तयार करून  शहरात  वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकण्यात येऊन  लाखोंचा माल जप्त केला आहे त्यात दर्शन पान सेंटर,प्रो. किशोर चौधरी यांच्या कडे अवैधरित्या गुटखा विक्री करतांना आढळून आल्याने  1970 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच गुरुकृपा प्रोव्हिजन प्रो. दयानंद अमरलाल सिंधी यांच्याकडे 51हजार 207 रुपयाचा महादेव स्वीट,प्रो. धनराज रूपचंद गेही यांच्याकडे 55 हजार 602 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .नवल झंननालाल जैन यांच्या गोडावून मध्यें  58 हजार 479 रुपयेचा मुद्देमाल मिळून आल्याने   चौंघांना  ताब्यात घेण्यात येऊन गोडावून व दुकानांना  सील करण्यात आले आहे. एकूण 1 लाख 67 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे 

 ही धडक कारवाई जॉईन कमिशनर नाशिक डिव्हिजन, एस .बी नारागुडे,असिस्टंट कमिशनर नाशिक उदय लोहकरे,असिस्टंट कमिशनर जळगाव संतोष कांबळे,फूड सेफ्टी ऑफिसर धुळे के एच बाविस्कर,फूड सेफ्टी ऑफिसर जळगाव एस एम पवार,फूड सेफ्टी ऑफिसर नंदुरबार बेबी पवार,फूड सेफ्टी ऑफिसर नाशीक जी.व्हि कासार,फूड सेफ्टी ऑफिसर नाशिक यु.आर सूर्यवंशी,वाय आर देशमुख, यांच्या पथकाने केली आहे.  सायंकाळच्या सुमारास पोलिसांत गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने