अडावद व रुखनखेडा गावी भारत संकल्प यात्रेचे आगमन
चोपडा दि.८(प्रतिनिधी)आज दिनांक-८ डिसेंबर २०२३ शुक्रवार रोजी सकाळी ९ वाजेला अडावद तथा रुखनखेडा (प्र.अडावद) येथे सकाळी ११ वाजेला या दोन गावांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचे आगमन झाले.
भारत सरकारने आयोजित केलेल्या "विकसित भारत संकल्प" यात्रेची ग्रामपंचायत अडावद तथा ग्रामपंचायत रुखनखेडा (प्र.अडावद) येथे रोजचे दोन गावं निवडून, जनतेसाठी भारत सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या त्यांच्या विविध योजना यात्रेत एका वाहनांवर बसवलेल्या एलइडी वर व्हिडीओ/ चित्र प्रदर्शित करण्यात आले.
अडावद आरोग्य केंद्राकडून गावांतील लोकांच्या आयुष्यमान भव कार्डाची, ई के वाय.सी.करण्यात आली.महाराष्ट्र शासनाची निरोगी आरोग्य तरुणाईचे उपक्रम अंतर्गत 18+ वर्षावरील लोकांची आरोग्य तपासणी करून NATVM या अँपमध्ये ऑनलाइन नोंदणी करण्यात आली.रक्तातील सिकलसेल आजार, क्षयरोग आजार, या सर्व आजाराबाबत जनजागृती करण्यात आली.
वरीलप्रमाणे सर्व तपासणी व जनजागृती करतांना समुदाय आरोग्य अधिकारी-डॉ.माधुरी महाजन, प्र.आरोग्य सहाय्यक-विजय देशमुख, आरोग्य सहाय्यीका-शोभा चौधरी, आरोग्य सेवक-संतोष भांडवलकर, कैलास बडगुजर सह आशा सेविका आदींनी परिश्रम घेत आहेत.
प्रसंगी गावांतील सरपंच /उपसरपंच /सदस्य /नोडल अधिकारी/ग्राम विकास अधिकारी/सर्व ग्रामस्थ, आणि प्रा.आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्चना पाटील,डॉ. अक्षय पाटील व सर्व समुदाय आरोग्य अधिकारी सह सर्व आरोग्य कर्मचारी वर्ग, आशा सेविका, ग्राम पंचायत कर्मचारी व पा.पु.पुरवठा कर्मचारी आदी उपस्थित राहिले.
