तापी सह.सूतगिरणीजवळ खड्डा आल्याने बस चालक गाडीच्या बाहेर .. सुदैवाने प्रवासी बालंबाल बचावले.. ड्रायव्हर तडकाफडकी निलंबित

 तापी सह.सूतगिरणीजवळ खड्डा आल्याने बस चालक गाडीच्या बाहेर .. सुदैवाने प्रवासी बालंबाल बचावले.. ड्रायव्हर तडकाफडकी निलंबित 

 चोपडा दि.23 डिसेंबर(प्रतिनिधी): भरधाव वेगाने निघालेल्या नाशिक - चोपडा  बसला खड्ड्यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने चालक  गाडीतून बाहेर फेकला जाऊन  गाडी तापी सूतगिरणीच्या गेटवर जाऊन  आदळली. सुदैवाने झालेल्या अपघातात   प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली  नसल्याचे समजते.मात्र याबाबत वरिष्ठ पातळीवरून लागलीच दखल घेऊन चालकास तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याच्या   माहितीस आगार व्यवस्थापकांनी दुजोरा दिला आहे

 याबाबत प्राप्त माहिती अशी की, सकाळी 11 वाजेच्या सुमारास 61 प्रवासी घेऊन चोपडा आगारातून (एम एच 14 बी टी 21 42 )नंबरची बस गाडी घेऊन चालक विनोद कोळी हा चोपड्याहून  सुसाट वेगाने निघाला असता वेले गावाच्या बाहेर धरणगाव रस्त्यावरील तापी सहकारी सूतगिरणी जवळ मोठा खड्डा आल्याने गाडीतून चालक बाहेर फेकला गेला की ,चालकाने उडी घेतली अशी संभ्रमावस्थेतील प्रकार  घडून   विना चालकाची गाडी सूतगिरणीच्या गेटमधून  एन्ट्री करत भिंती जवळ आदळली. या प्रकाराने  प्रवासी मात्र  काही  कमालीचे भांबावून गेल्याने गोंधळ उडाला. दरम्यान  चालक गाडीच्या मागे धावत  असल्याचे चित्र सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याने  घटनेचा संभ्रम निर्माण झाला आहे .याबाबत आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता विनोद कोळी वय 35 यास वरिष्ठ कार्यालयातून निलंबित करण्याची करण्यात आल्याची माहिती मिळाली . एकंदरीत मोठा अपघात होता होता वाचला आहे.गावभर  अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने