वाणी युवा मंचचे संस्थापक शाखाध्यक्ष डी.आर.कोतकर यांचा समाजभूषण पुरस्कार
पाचोरा दि.४(प्रतिनिधी)महाराष्ट्र प्रोत्साहन फाउंडेशन व लाड शाखीय वाणी समाज मंडळ, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)आयोजित पुरस्कार वितरण सोहळा 2023 संपन्न झाला.त्यात पाचोरा येथील महाराष्ट्र वाणी युवा मंचचे संस्थापक शाखाध्यक्ष डी.आर.कोतकर यांना सामाजिक, शैक्षणिक तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याबद्दल राज्यस्तरीय कार्यक्रमात समाजभूषण पुरस्कार देऊन नामदार अतुलजी सावे (गृहनिर्माण व इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई)यांच्या शुभहस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गिरीश रामचंद्र वाणी हे होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी संजय केनेकर (सरचिटणीस,भाजपा महाराष्ट्र प्रदेश छत्रपती संभाजीनगर) , नीतीन देव(आळंदी) नितीन दहिवेलकर (नाशिक), डॉ.शशिकांत वाणी(तळोदा), शशिकांत महालपुरे सर (पाचोरा), शरद नेरकर (नामपुर)इत्यादी जण उपस्थित होते. कार्यक्रमास पाचोरा येथील विजय सोनजे, प्रकाश येवले, योगेश शेंडे सर, सुनील कोतकर , सौ.मनीषा कोतकर इ.उपस्थित होते
