'चोपडा शिवसेना तर्फे शिवमहापुराण कथेसाठी जाणाऱ्या भाविकांना फळे, फराळ व पाणी बाॅटलचे वाटप'
चोपडादि.१० (प्रतिनीधी) - जळगाव तालुक्यातील वडनगरी येथील बडे जठाधारी महादेव मंदिर परिसरात आंतरराष्ट्रीय प्रवचनकार पंडीत श्री.प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा सुरू असून जिल्हाभरातून लाखो भाविकांची उपस्थिती लाभत आहे.चोपडा तालुक्यातून देखील दररोज हजारोंच्या संख्येने महीला व पुरूष भाविक भक्त चोपडा आगारातून येजा करत आहेत.त्यासाठी रविवारी शिवसेना परीवार चोपडा तर्फे सर्व भाविकांसाठी पाण्याची बाॅटल आणि नाश्त्यासाठी शेव, चिवडा, मुरमुरे व पेरू फळांची २१ कॅरेट आदी वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला.
सकाळी ७ वाजेपासून बस आगारात शिवमहापुराण कथेला जाणाऱ्या भाविकांना रांगेत जाऊन एक पाण्याची बाॅटल, पेरू फळासह पॅकिंग केलेला शेव व चिवडा नाश्ता म्हणून देण्यात आला.
जवळपास ३००० भाविकांना नाश्ता व पाणी बाॅटलसह फळांचे वाटप झाल्याची माहीती कार्यक्रमाचे आयोजक श्री.राजेंद्र गंगाधर पाटील यांनी दिली आहे.
या उपक्रमासाठी माजी नगरसेवक मेहमूद बागवान, श्री.राजेंद्र गंगाधर पाटील, श्री.सचिन सांगोरे, श्री.महेश शर्मा, श्री.धनंजय निनायदे, श्री.संदीप धनगर, श्री.निखील एकनाथ पाटील, अशफाक शेख, श्री.किरण पाटील, श्री.संतोष धोंडू पाटील, श्री.प्रविण शंकर धनगर यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाला बाजार समिती सभापती श्री.नरेंद्र पाटील, संचालक श्री.रावसाहेब पाटील, श्री.गोपाल पाटील, अँड शिवराज पाटील, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य श्री.राजेंद्र पाटील, श्री ए.के.गंभीर, दोंदवाडे उपसरपंच मनोज पाटील, श्री.अनिल बाविस्कर, श्री.संदीप कोळी (चौगाव), श्री.नंदु गवळी, श्री.दिव्यांक सावंत, श्री.निखिल पाटील (रुखनखेडे), श्री.मंगल इंगळे, अशफाक शेख, श्री.सचिन सांगोरे, श्री.सुनिल पाटील (वढोदा) , श्री.नितीन चौधरी, हाजी शब्बीर बागवान, अझहर शेख, ईलियाज शेख, अली बागवान, गोलु मराठे, राजा बागवान, श्री.किरण पाटील (घोडगाव) आदी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्व भाविक भक्तगण यांनी शिवसेना परिवाराचे कौतुक केले तर आगार व्यवस्थापक श्री.महेंद्र पाटील यांनी आभार मानले.

