ग्रामपंचायत निवडणुकीबाबत राष्ट्रवादीचा तो खटमल दावा हास्यास्पद .. गणित येत नसल्यास भगवाधारीं सरपंच दादांचा आकडा पुन्हा मोजून पाहावा.. बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील यांचा सल्ला

 

ग्रामपंचायत निवडणुकीबाबत राष्ट्रवादीचा तो खटमल दावा हास्यास्पद .. गणित येत नसल्यास भगवाधारीं सरपंच दादांचा आकडा  पुन्हा मोजून पाहावा.. बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील यांचा सल्ला 

चोपडा दि.८(प्रतिनिधी) तालुक्यातील २२ ग्रामपंचायत निवडणुकीत  शिवसेनेने प्रचंड उसंडी घेतल्याने विरोधकांना चांगलीच चपराक बसली आहे.रा.कॉ. तालुका कार्यकत्यांनी कांगावा करीत  सर्वाधिक जागा जिंकल्याची अफवा पसरवून जनतेच्या डोळ्यात पुन्हा धूळफेक करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.मात्र वास्तवात २२पैकी १२ सरपंच व सर्वाधिक सदस्य हे सेनेचे असून त्यांनी भगवा फडविण्यात आपली जोरदार बॅटिंग दाखवत विरोधकांना क्लिन बोर्ड केले आहे. तरीही  आपलेच सर्वाधिक गडी म्हणणाऱ्यांना सामनावीरांचे  फोटो सेशन करून  खुलासा करावा लागणे म्हणजे  तालुक्याचे राजकारण खालच्या पातळीत आल्याचे चिन्हे असल्याचा घणाघात बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील यांनी केला आहे.तालुक्याचे  लोकप्रिय आमदार सौ.लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या विकास कामांच्या धुव्वाधार षटकारांनी विरोधकांची फिल्डींग मोडकळीस आल्याने  काय करावे अन् काय करू नये अशा द्विधा मनस्थितीने वारंवार  राजकीय तोल सुटत असावा  असा टोलाही त्यांनी लगावला 

  शासकीय विश्राम गृह येथे आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे तसेच तहसिलदार भाऊसाहेब थोरात व पुरवठा अधिकारी दत्ताञे नेतकर यांच्या उपस्थित आनंदाचा शिधा व शेतकरी आत्महत्याग्रस्त वारसांना धनादेश वाटप करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. 

२२ ग्रामपंचायती पैकी १२ ग्रामपंचायत व १३ वी ग्रामपंचायत घुमावल येथे सहा सदस्य हे शिवसेनेकडून निवडून आले आहेत. सरपंच पद रिक्त असुन तेथे देखिल शिवसेनेचेच वर्चस्व असेल असेही सभापती नरेंद्र पाटील यांनी  स्पष्ट केले.यावेळीराजेंद्र पाटील, सागरभाऊ ओतारी,रावसाहेब पाटील,गोपाल पाटील,विजय पाटील,किरण देवराज,शिवराज पाटील,कल्पना पाटील,नितीन पाटील, गोपाल चौधरी,प्रकाश राजपूत,प्रताप अण्णा,गोरख कोळी,नितीन सर,इचल पाटील,निवृत्ती पाटील सर,संतोष पाटील,चंद्रभान कोळी,कैलास कोळी, भरत पाटील,शरद पाटील,भूषण पाटील,पप्पू,प्रताप पाटील,मंगला पाटील,कैलास बाविस्कर,गंभीर सर, किशोर माळी सर आदी  मान्यवर उपस्थित होते.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने