भारतीय गो क्रांती मंच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी ऍड व्ही. एस. भोलाणे यांची दिल्ली येथे संत महन्तांच्या उपस्थितीत निवड
*चोपडादि.६(प्रतिनिधी) भारतीय गोक्रांती मंच नवी दिल्ली या अखिल भारतीय संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारी मंडळाची व प्रदेश प्रतिनिधींचे संयुक्त सभा पंजाबी बाग दिल्ली येथे 5 नोव्हेंबर 2023 रोजी गो कृपाकांक्षी विश्वसंत श्री गोपालमनीजी महाराज यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. 20 नोव्हेंबर 2023 रोजी रामालिला मैदान नवी दिल्ली येथे चारही शंकराचार्यानच्या उपस्थितीत व आशीर्वादाने तसेच देशातील साधू संतांच्या उपस्थितीत गायीला गोमाता हा राष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा म्हणून गोमाता राष्ट्रमाता प्रतिष्ठा आंदोलन गोपाष्टमीच्या दिवशी होत आहे.यावेली प्रदेश तेली वकील महासंघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष, पत्रकार समाजिक कार्यकर्ते,गौभक्त ऍड. श्री व्ही.एस. भोलाने धरणगाव यांची भारतीय गो क्रांती मंचच्या महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली. संत महन्तांच्या व गो भक्तांच्या उपस्थितीत ही नियुक्ती करण्यात आली.
संत श्री गोपाळमणीजी महाराज यांनी नियुक्तिपत्र देऊन अभिनंदन केले.यावेळी भारतीय गो क्रांती मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाषचंद्र शर्मा दिल्ली,मेठानी उत्तराखंड,कुसुमबहन दिल्ली,संपादक प्रमोद बराटे,के.डी. चौधरी सर, लखन भाई तेली,देवकांत चौधरी,डॉ मिलिंद दहाडे ,रतिलाल चौधरी,सुधाकर शेट वानी,वासुदेव कडु महाजन,शिरीष बयास, रवींद्र कणखरे,सत्यवान कणखरे,मोहन पाटील,आत्माराम चौधरी,कडु रूपा महाजन,प्रशांत मुंडके, आनंद बाजपेयी,किरण वाणी, डॉ राजेंद्र चौधरी,आबा चौधरी, अनिल शिवदास चौधरी आदिनी अभिनंदन केले.
