सुरत येथील "दोडेगुर्जर प्रीमियर लीग २०२३" सामन्यात सतखेडयाचा मृत्यूंजय विजेता तर चोपड्याचा संघ उपविजेता*
सुरत दि.२०(प्रतिनिधी):सुरत येथील "दोडेगुर्जर प्रीमियर लीग २०२३" सामन्यात* महाराष्ट्रातील सतखेडा येथील "मृत्यूंजय" हा संघ विजेता म्हणून तर चोपड्याचा "वंदेमातरम" संघ उपविजेता म्हणून ठरला आहे .नुकतेच सुरतच्या बेस्तानमधील "साई फकीर" स्टेडियमला २०२३ प्रीमियर लीगमध्ये महाराष्ट्रातील चार संघ व सुरत मधील चार संघ, अशा एकूण आठ संघांनी मध्ये सहभाग घेतला होता.
सदर प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक-उज्वल पाटील (सतखेडेकर) चेतन पाटील, (कलालीकर) हुकूमचंद पाटील, (मोहीदेकर) प्रमोद पाटील, (वढोदेकर) यांनी सर्व आठही सामन्यांचे अतिशय सुंदर नियोजन बध्द आयोजन केले होते.आयोजकांन कडून आकर्षक चषक व प्रशस्तीपत्र देऊन, विजेता व उप विजेत्या संघांना सन्मानित करण्यात आले.महाराष्ट्रातील "मृत्यूंजय" हा संघ विजेता म्हणून तर "वंदेमातरम" संघ उपविजेता म्हणून ठरला.विजेता व उपविजेता या दोघेही संघांमध्ये, अतीशय रोमांचक व चुरशीपुर्वक सामना खेळण्यात आला,
मृत्युंजय संघाने जबरदस्त खेळी खेळून विजयश्री खेचून आणली त्यासाठी संघाचे कॅप्टन - स्वप्नील पाटील ,हर्षल पाटील,दीपक पाटील,स्वप्नील पाटील,राकेश पाटील,दिनेश पाटील,अतुल पाटील,धनजय पाटील,समाधान पाटील,पिंटू पाटील ,भूषण पाटीलसर्व सतखेडा येथील रहिवासी असून सर्वच खेळाडूंनी चांगली कामगिरी बजावल्याने मृत्यूंजय संघाची झलक पर राज्यात दिसली आहे.
चोपड्याचा उपविजेता "वंदेमातरम" या संघाचे "प्रायोजक" सुरत येथील ऍड.विनोद पाटील (वेलेकर) यांनीआणि वरील सर्व आयोजकांनी देखील सर्व खेळाळू यांचे मार्गदर्शन व सर्व संघाचे मनोबल वाढविण्यासाठी, मोलाचे योगदान दिले.तसेच संघाचे नेतृत्व कर्णधार किरण पाटील (हनुमंतखेडेकर) तर उपकर्णधार-जितेंद्र पाटील (मजरेहोळकर) यांनी केले.
सदरच्या संघात नंदकिशोर देशमुख (सुंदरगढीकर) गुड्डू पाटील (वाघळूदकर) भगवान पाटील (झुरखेडेकर) संदीप पाटील (मजरेहोळकर) गजानन पाटील (गाढोदेकर) सुरज देशमुख, गोलु देशमुख (सुंदरगढीकर) यश पाटील (पाळधीकर) मयूर पाटील (वर्डीकर) सुदर्शन पाटील (वाघळुदकर) गौरव पाटील (हनुमंत खेडेकर) या सर्व खेळाळूनी संघ उपविजेता होण्यासाठी खुप परिश्रम घेतले.
