अखेर अशोक नगर व इंदिरा नगर भागातील १०० घरांचा पाण्याचा प्रश्न सुटला.. माजी आमदार प्रा चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या आदेशान्वये सामाजिक कार्यकर्ते सागर ओतारी यांच्या पाठपुराव्याला यश

 अखेर अशोक नगर व इंदिरा नगर भागातील १०० घरांचा पाण्याचा प्रश्न सुटला.. माजी आमदार प्रा चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या आदेशान्वये सामाजिक कार्यकर्ते सागर ओतारी यांच्या पाठपुराव्याला यश


चोपडा दि.१७(प्रतिनिधी)शहरातील अशोक नगर व इंदिरानगर भागातील पाण्याची जटिल समस्या माजी आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या आदेशान्वये  सामाजिक कार्यकर्ते सागर भाऊ ओतारी यांच्या पाठपुराव्याने मार्गी लागले आहे शंभर घरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नच मिटल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते व्हाल्व फिरवून पाणी सोडण्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी महोदयांनी विविध समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले .

प्रारंभी सोनवणे दांपत्याचे ढोल ताशांचे गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले. अशोक नगर व इंदिरानगर परिसरातील महिला आणि पुरुषांनी पाण्यासाठी अनेक मोर्चे काढून  न.पा. च्या पायऱ्या घिसून  टाकल्या मात्र सत्ताधारींनी कोणतीही दखल न घेतल्याने  मोर्चा अखेर आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या कार्यालयात वळला. समस्याग्रस्तांची गाऱ्हाणे व समस्या ऐकून  त्यांनी ताबडतोब सामाजिक कार्यकर्ते सागर भाऊ ओतारी यांना आदेश फर्मावले  त्यानुसार सागर भाऊंनी न.पा. कडे सतत  पाठपुरावा करून स्वतंत्र पाईपलाईन करून व दोन व्हाल्व चे काम मार्गी लावले आणि शंभर घरांच्या पाण्याच्या प्रश्न कायमचा निकाली काढला .

या कार्यक्रमप्रसंगी बाजार समिती सभापती नरेंद्र आबा पाटील, संचालिका सौ कल्पनाताई पाटील, महिला तालुकाप्रमुख मंगलाताई पाटील, श्रीमती रेखाताई ओतारी, भरत पाटील, संचालक रावसाहेब पाटील, यावल मार्केट कमिटी संचालक सूर्यभान पाटील, कैलास बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी परिसरातील रहिवासीं मोठ्या संख्येने हजर होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने