बापरे बाप..!बाजारपेठेत दिवसाढवळ्या पावणे तीन लाख चोरी
चोपडा,दि.४ (प्रतिनिधी) --- शहरातील शनी मंदिर परिसरातुन भरदिवसा दुचाकीला टांगलेली बॅगेतून 2 लाख 75 हजार रुपये लंपास करून चोरटे पसार झाले. भर दिवसा आणि मुख्य बाजारपेठ भागात घडल्याने ही घटना घडल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सविस्तर असे की, शहरातील शनी मंदिरा समोर समीक्षा ड्रायफ्रूट वर महेश पतसंस्थाचे आवर्त (रिकरिंग) खाते करणारा शरद रामदास बाविस्कर हा समीक्षा ड्रायफ्रुट वर रिकरिंग ची पावती फाडण्यासाठी गेला असता दुचाकीला लागलेली बॅग घेऊन चोरटे पसार झाले त्यात महेश पतसंस्थातुन वितरण केलेले किरण शिंपी यांचे 1 लाख रुपये आणि शरद बाविस्कर यांचा पगार इतर असे 1 लाख 75 हजार रुपये असे एकूण 2 लाख 75 हजार रुपये रोख लंपास केले याबाबत चोपडा शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते अनेक दुकांनाच्या सीसीटीव्ही केमॅरे बघणे सुरू होते. घटनास्थळी डीवायएसपी ऋषिकेश रावले, पोलिस निरीक्षक कविता कमलाकर यांच्या सर्व अधिकारी तपास कामी लागले