वरणगाव आयुध निर्मानी मार्फत क्षयरूग्णांना पोषण आहारचे वाटप
वरणगाव दि.२३(प्रतिनिधी) आज दिनांक= 20/10/2023 शुक्रवार रोजी, प्रधानमंत्री टिबी मुक्त भारत अभियान अंतर्गत निक्षय पोषण आहार जळगाव जिल्ह्यातील क्षयरूग्णांना वाटप करण्यात आले.
आयुध निर्मानी वरणगाव मार्फत - सी. एस. आर फंड. अंतर्गत जिल्ह्यातील क्षयरुग्णांपैकी आज 50 क्षयरुग्णांना पोषण आहार किट चे वाटप करण्याचा शुभारंभ करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन आयुध निर्मानी वरणगाव यांच्या मार्फत करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अजय कुमार सिंग, (जनरल मॅनजर) श्री. महेश शिंदे (असिस्टंट जनरल मॅनजर) आयुध निर्मानी वरणगाव मा.श्री.डॉ.देवेंद्र जायभाये , जिल्हा क्षयरोग अधिकारी जळगाव),सो भारती पाटील आधार बहुद्इदेशीय संस्था अमळनेर तसेच श्री.मिलिंद पाटील-टीडब्लूजे असोशियेशन जळगाव इ. मान्यवर उपस्थित होते.जिल्ह्यातील क्षयरुग्ण सहा महिने दत्तकघेतल्या बद्दल MIL ordance factory वरणगाव यांचे आभार प्रमाण पत्र देऊन डॉ.देवेंद्र जायभाये यांनी आभार मानले.
प्रधानमंत्री टी. बी मुक्त भारत अभियान मार्फत निक्षय मित्र पोषण आहार योजने मुळे क्षयरुग्णांना मिळणारा लाभ या विषयी डॉ.देवेंद्र जायभाये यांनी सविस्तर मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमात डॉ.तसेच अजय कुमार सिंग यांनी आयुध निर्मानी वरणगाव मार्फत C.S.R फंडमधून सामाजिक दायित्व म्हणून करत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. सध्या जळगाव जिल्ह्यातील ५० क्षयरुग्णांना ३ महिन्याचा पोषण आहार दिला गेला व भविष्यात जिल्ह्यातून उर्सवरित र्व क्षयरुग्णांना C.S.R फंडाच्या माध्यमातून पोषण आहार दिला जाणार असल्याचे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी विलास पाटील (D.P.S), किरणकुमार निकम (DPPM), दीपक संदानशिव टिबी समुपदेशक, किशोर मराठे व जिल्हा क्षयरोग केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते या मधे STS, STLS, TBHV, इ. तसेच आयुध निर्मानी वरणगाव मार्फत संजय पाटील (JW) सर्व युनियन असोसिएशन अध्यक्ष , MIC - WWA OF E , आणि सर्व एक्झिक्युटिव्ह मेंबर यांनी अनमोल असे सहकार्य केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. परवेज शेख यांनी केले.