तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा निषेधार्थ भारतीय जनता पार्टी तर्फे आंदोलन

 

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या  निषेधार्थ भारतीय जनता पार्टी तर्फे  आंदोलन 

चोपडादि.२३(प्रतिनिधी) तालुक्यातील भारतीय जनता पार्टी  तर्फे आज दिनांक २१ ऑक्टोबर रोजी चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन छेडण्यात आले.

कंत्राटी भरतीचा निर्णय तात्कालिन महाविकास आघाडी (उबाठा) सरकारने घेऊन राज्यातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे महापाप केले होते या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज चौक चोपडा येथे  श्री चंद्रशेखर जी बावनकुळे (अध्यक्ष ,भाजपा,महाराष्ट्र) ह्यांचे आदेशानुसार   भारतीय जनता पार्टीच्या वतीने काँग्रेस, उबाठा व राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचा निषेध करण्यात आला मागील महाविकास आघाडी सरकार चा जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले जोरदार घोषणाबाजी करत महाविकास आघाडी चा निषेध करण्यात आला.

            यावेळी  जेष्ठ नेते चंद्रशेखर पाटील,तालुका अध्यक्ष पंकज पाटील,शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल,जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील,जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे,जिल्हा उपाध्यक्ष अंबादास सिसोदीया,जिल्हा उपाध्यक्ष सौ जोन्साताई चौधरी,ग्रामपंचायत सदस्य सौ विमलबाई,व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मराठे,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील,सरचिटणीस हनुमंत महाजन,मनोहर बडगुजर,ओबीसी आघाडी तालुका अध्यक्ष कांतीलाल पाटील,भाजप नेते सुरेश पाटीलभाजप नेते मनिष पारिख,शक्तिकेंद्र प्रमुख दिपक पाटील,बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा सदस्य लक्ष्मण पाटील,भाजप नेते योगराज पाटील,सोशल मिडीया प्रमुख धर्मदास पाटील,शहर उपाध्यक्ष गोपाल पाटील,बुथ प्रमुख भरत पाटील मितावली कर,अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष प्रेम घोगरे,बुथ प्रमुख अनिल बोरसे,वार रूम प्रमुख राकेश वाघ या सह भारतीय जनता पार्टी चे पदअधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने