चोपड्यात अनोख्या सजावटीमुळे मल्हारपुऱ्यातील जय भवानी गणेश मंडळाचा नावलौकिक..दर्शनासाठी गणेश भक्तांची उसळते तोबा गर्दी
चोपडा,दि.२१(प्रतिनिधी) :शहरात जनजागृतीचा वसा हाती घेतलेल्या गणेश मंडळांपैकी चोपडा नगरीचा राजा जय भवानी मंडळाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. नुसती गणरायाची स्थापना हा उद्देश डोळ्यांसमोर न ठेवता जनजागृतीचा संदेश सर्व सामान्य माणसांपर्यंत पोहोचवावा असे प्रबोधनाचे मौखिक कार्य हे मंडळ करीत आहे.यंदा चंद्रयान ३ लॉन्चींगचे दृश्य हुबेहूब सजावट करून भक्तांना सुखद धक्का दिला आहे.एकंदरीत या मंडळाचे दरवर्षाप्रमाणे अनोख्या सजावटीमुळे भाविक भक्त गणेश दर्शनासाठी तोबा गर्दी करतात.
चोपडा शहराच्या इतिहासातील सर्वात पहिले गणेश मंडळ म्हणून जय भवानी मंडळ, मल्हारपुराचे नाव घेतले जाते.या मंडळाने 83 वर्षा पासून गणेशोत्सवाची परंपरा अखंड चालु ठेवलेली आहे. डेकोरेशनच्या माध्यमातून समाजाला काहीना काही नवीन संदेश देण्याचे काम मंडळ करीत आहे.यावर्षी ही नुकतेच चंद्रावर गेलेल्या चंद्रयान 3 लॉन्चिंग चे डेकोरेशन केले आहे .मंडळाचे कार्यकर्तेमंडळाचे अध्यक्ष श्री.दिपक भगवंतराव पाटील व श्री.महेंद्र रामकृष्ण पाटील,शेखर पाटील ,भुषण पाटील, राहुल पाटील, अभिजीत पाटील यांच्या संकल्प नेतुन धर्मेंद्र पाटील, मनिष शिंदे, मयुर पाटील, खिलेश पाटील, रुपेश पाटील, सौरभ पाटील, महेंद्र महाजन, मोहित पाटील,ऋषिकेश महाजन, कीर्तिराज पाटील , तेजस शिंदे, यश पाटील ,निल पाटील ,जय पाटील व मंडळातील कार्यकर्त्यांच्या सहभागातून अतिशय सुंदर रित्या चंद्रयान 3 चे डेकोरेशन साध्य केले आहे.