शिरपूर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा - शेतकरी पुत्रांची मागणी

 शिरपूर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा - शेतकरी पुत्रांची मागणी

 शिरपूर दि.८(प्रतिनिधी)तालुक्यात पाऊस नसल्याने शिरपूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा असे निवेदन 'सेवा फर्स्ट' द्वारे शिरपूर येथील तहसीलदारांना करण्यात आले.

 शिरपूर तालुक्यात पाऊस खूपच कमी झालेला आहे.सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी आजही तालुक्यात ४०० मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झालेला नाही. त्यामुळे तालुक्यात सरासरीच्या फक्त ६०  टक्के पाऊस झालेला आहे. त्यातच आता उन्हाची तीव्रता वाढली आहे.यामुळे शेतातील पिके करपू लागली आहेत.पावसाच्या अभावाने शेतकरी संकटात सापडला आहे. यामुळे बळीराजाला मोठ्या संकटाच्या सामोरे जावे लागत आहे.

    तालुक्यात जवखेडा मंडळात तर फक्त २२२ मिलिमीटर पाऊस झालेला आहे.आणि तालुक्यात फक्त सरासरी च्या ४१६ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. पुढे परिस्थिती अजून बिकट होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास होत आहे.

यामुळे तहसीलदारांनी शासनाकडे पाठपुरावा करावा, शिरपूर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि विद्यार्थ्यांची फी माफ करावी अन्यथा ती शासनाने भरावी किंवा शैक्षणिक शुल्कात काही प्रमाणात कपात करावी जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि तालुक्यातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी शेतकरी पुत्रांमार्फत विनंती करतो असे 'सेवा फर्स्ट'चे समनव्यक हंसराज चौधरी यांनी सांगितले.निवेदन देण्यावेळी 'सेवा फर्स्ट'चे कार्यकर्ते, शेतकरीपुत्र, आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने