कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. रमेशदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
चोपडा दि.४(प्रतिनिधी)कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विधानपरिषद सदस्य आ. रमेशजी दादा पाटील ह्यांच्या १५ सप्टेंबर रोजी येवू घातलेल्या वाढदिवसाचे अवचित साधून जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका येथे त्यासाठी कोळी महासंघाचे पदाधिकारी तथा समाज बांधवानी दि०३ रोजी शासकीय विश्रामगृह चोपडा येथे मिटिंग संपन्न झाली. त्यात विविध कार्यक्रम हाती घेण्याचे ठरविण्यात आले.
बैठकीत आ.पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संघटना मजबुती करण करणे, ्गाव तेथे कोळी महासंघाची शाखा ओपन करणे,संघटनाच्या माध्यमातून समाजाची सामाजिक समस्या सोडवणे,तरुणांना सामाजिक काम करण्यासाठी तयार करणे,ज्यांनी समाजासाठी जेल भोगली अशा समाजभुषण लोकांचा सत्कार करण्याचा ठराव पास करण्यात आला आहे सूत्रसंचालन अनिल कोळी (कोळंबा) ह्यांनी केले.
यावेळी कोळी महासंघ कार्यकर्ते मगन बाविस्कर , विजय बाविस्कर ता.अध्यक्ष , अनिल कोळी (कोळंबा) तालुका सचिव , गजानन कोळी नरेंद्र ता.उपाध्यक्ष ,बाळू कोळी, भाईदास कोळी, गोपाळ बाविस्कर, भरत पाटील जेष्ठ समाजसेवक, शशी कोळी, समाधान कोळी, अरुण कोळी, लखीचंद कोळी, रविंद्र कोळी, रतन रायसिंग, सुनील कोळी, देवेंद्र कोळी, भरत कोळी, सागर कोळी, जयेश कोळी, कांतीलाल कोळी, प्रशांत कोळी, देवरथ कोळी, योगेश बाविस्कर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
