जिल्हाधिकारी यांचे हस्ते गोल्डन कार्ड व आभा कार्डचे मोफत वाटप.

 

जिल्हाधिकारी यांचे हस्ते गोल्डन कार्ड व आभा कार्डचे मोफत वाटप

धरणगाव दि.३०(प्रतिनिधी)आज दिनांक-३० सप्टेंबर शनिवार रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे उपस्थितीत मुसळी येथे आयुष्यमान भव आरोग्य मेळावा सम्पन्न झाला . जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, कुष्ठरोग सहा संचालक, डॉ.जयवंत मोरे, धरणगाव तालुका- तहसीलदार, जिल्हास्तरीय टीम यांनी सदर कार्यक्रमाला भेट दिली.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय चव्हाण यांच्या  मार्गदर्शनाने सदरचा "आयुष्यमान भव साप्ताहिक आरोग्य मेळावा" घेण्यात आला.  

आजच्या आरोग्य मेळाव्यात, संसर्गजन्य आजार, क्षयरोग व कुष्ठरोग बाबत संशयित रुग्णांची तपासणी, निदान व संदर्भ सेवा तथा उपचारबाबत कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्यात आली.

 जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत माहिती देण्यात आली,

तसेच कार्यक्रमांमध्ये आयुष्यमान भव या कार्यक्रमा अंतर्गत, जिल्हाधिकारी यांचे सह उपस्थित सर्व मान्यवर, ग्रामस्थ, आरोग्य कर्मचारी, शिक्षक वृंद, आशा सेविका,अंगणवाडी सेविका, आदींच्या मार्फत सामूहिक अवयदानाची प्रतिज्ञा देखील घेण्यात आली,

 सदर कार्यक्रमांमध्ये जिल्हाधिकारी,जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना आयुष्यमान गोल्डन कार्डचे तसेच आभा कार्डचे मोफत वाटप करण्यात आले,

संशयित क्षयरुग्णाचा बेडका तपासणी साठी घेण्यात आला, कुष्ठरोग उपचारासाठी देखील तपासणी करण्यात आली, उच्च रक्तदाब, मधुमेहासाठी देखील रुग्णांची तपासणी करण्यात येऊन बाधीत रुग्णांना औषोधोउपचार करण्यात आला.

 सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी... मुसळी ग्रामपंचायत सरपंच, वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य विभाग टीम,तहसील कार्यालय अधिकारी, पंचायत समिती अधिकारी/कर्मचारी, सर्व शिक्षक वृंद, ग्रामपंचायत सदस्य, सर्व अंगणवाडी सेविका व आशासेविका आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाच्या सुरवातीला सूत्र संचालन आरोग्य सेवक-प्रेम त्रिवेदी यांनी केले तर,कार्यक्रमाच्या शेवटी  डॉ.संजय चव्हाण यांनी मान्यवरांचे आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने