चोपडा शहरातील गणेशोत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक संपन्न

 

चोपडा शहरातील गणेशोत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक संपन्न

चोपडा,दि.16(प्रतिनिधी) शहरात आज दिनांक १५ सप्टेंबर रोजी शरश्चंद्रीका अक्का नपा नाट्यगृह  येथे शहरातील गणेशोत्सव साठीची शांतता समितीची बैठक आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार साहेब व माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई  गुजराथी,  यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली

यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे ,प्रांत अधिकारी एकनाथ बगाडे , डीवायएसपी ऋषीकेश रावले , तहसीलदार भाऊसाहेब थोरात ,शहर पीआय के. के. पाटील , ग्रामीण पीआय कावेरी कमलाकर मॅडम ,उप अभियंता वीरेंद्र राजपूत , मुख्याधिकारी हेमंत निकम व प्रशासकीय अधिकारी मंचावर उपस्थित होते.यावेळी बोलताना माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी सर्व गणेश मंडळांना आणि प्रशासनास उपयुक्त सूचना करून श्री गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले.

 जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार  हे शांतता समितीच्या बैठकीसाठी आले असता त्यांचे विश्रामगृहवर स्वागत करण्यात आले.आ. सौ.लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे सोबत बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, संचालक रावसाहेब पाटील ,किरण देवराज, राजेंद्र पाटील, किशोर पाटील, गणेश पाटील, मंगल बाविस्कर, दिलिप भाऊसाहेब, कुणाल पाटील, मंगल इंगळे, गंभीर सर, कैलास बाविस्कर हे उपस्थित होते
    बैठकीस शहरातील नागरिक,गणेश मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने