चोपडा शहरात मोकाट जनावरांचा धुमाकूळ .. बस स्थानक परिसरात अस्वच्छता..न.पा.ने कडक कारवाई नागरीकांची मागणी

चोपडा शहरात मोकाट जनावरांचा धुमाकूळ .. बस स्थानक परिसरात अस्वच्छता..न.पा.ने कडक कारवाई नागरीकांची मागणी 

चोपडा,दि.२६ (प्रतिनिधी) राज्य परीवहन महामंडळाच्या चोपडा आगारात व बस स्थानक परिसरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला आहे.तरी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.महामंडळा कडुन राज्यभर हिंदू ह्रदय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान राबविण्यात येत असल्याने रोज आगार व बस स्थानकचा परीसर स्वच्छ व सुंदर करण्यावर भर दिला जात असुन संपूर्ण परीसरात वृक्षारोपण करण्यात आलेले आहे.परंतु मोकाट गुरेढोरेंचा वावर वाढल्याने ते संपूर्ण बस स्थानकात घाण करत असतात तर वृक्षारोपण केलेले झाडांचे देखील नुकसान करीत आहेत.तसेच मोकाट गुरेढोरे व इकडे तिकडे सैरवैर पळत असल्याने प्रवाशांना धक्का बुकी होवुन जखमी होण्याच्या घटना घडत आहे व छोटे मोठे अपघात घडत आहेत .तरी पालिका प्रशासनाने लक्ष घालुन मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने