धार्मिक विचारांचा पगडा असलेल्या सौ.मिराबाई जगन्नाथ महाजन यांचे देहदान ..मरणा आधी व्यक्त केलेली ईच्छा अखेर पूर्ण


धार्मिक विचारांचा पगडा असलेल्या सौ.मिराबाई जगन्नाथ महाजन यांचे देहदान ..मरणा आधी व्यक्त केलेली ईच्छा अखेर पूर्ण 

चोपडा दि.८(प्रतिनिधी )- येथील पवार नगर चोपडा रहिवासी (मुळगाव - खिरोदा ता.रावेर) सौ.मिराबाई जगन्नाथ महाजन (वय ७८) यांचे आज सकाळी ६.४५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना नातवंडे असा परिवार असून त्या खिरोदा येथील सेवानिवृत्त सहा.पशुधन विकास अधिकारी डॉ. जे. के. महाजन यांच्या पत्नी तर चोपडा येथील ललित कला केंद्राचे से.नि.प्राचार्य राजेंद्र महाजन, नंदकुमार महाजन (से.नि.क्लास वन अधिकारी) व घरडा केमिकल्स, रामदास महाजन (घरडा केमिकल्स, चिपळूण) यांची आई होत.

सौ. मीराबाई महाजन यांनी केलेल्या देहदानाच्या संकल्पानुसार त्यांचे शव जळगाव येथील डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या पथकाकडे सुपूर्द करण्यात आला.

        धार्मिक स्वभावाच्या असलेल्या स्व.मिराईंनी देहदान करुन समाजात एक आदर्श निर्माण केला, असे श्रद्धांजली वाहतांना माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथींनी  सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने