"महाराष्ट्र आदिवासी कोळी जमात एकता मंच कार्यकारिणी जाहीर
नाशिक दि.७(प्रतिनिधी): दिनांक 06 / 08 /2023 रविवारी रोजी नाशिक एकता मंचची बैठक अध्यक्ष संजयजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यात कोळी समाजाच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत त्यामुळे आता नवीन नावाने पुर्ण नाशिक जिल्हा आणि नंतर पुर्ण राज्यभर मंच काम करत राहणार आहे. मंचचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक संघटना मिळून एक मंच बनविण्यात आला आहे. आता नव्याने होणार्या मंच हा "महाराष्ट्र आदिवासी कोळी जमात एकता मंच, नाशिक जिल्हा" हे नाव सर्वांच्या सहमतीने ठेवण्यात आले आहे. त्यात कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
नुतन कार्यकारिणी अशी,अध्यक्ष = किसन शामराव सोनवणे, उपाध्यक्ष = सुरेश भिका नवसारे, कार्याध्यक्ष = युवराज चिंतामण सैंदाणे, सचिव = नितीन सुभाष शेवरे, खजिनदार = गणेश नामदेव राजकोर, कार्यकारिणी सदस्य म्हणून संजय गोरख शिंदे, सुभाष नथू मासरे आणि लक्ष्मण राजाराम कोळी यांची सर्वानुमते निवड घोषित करण्यात आली आहे.
त्याप्रमाणे आज महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली त्यात येणारा 9 आँगस्ट या दिवशी होणारा जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त होणारा कार्यक्रम देशात होणार्या आदिवासींवर अन्याया विरोधात आणि मणिपूर येथील आदिवासी महिलांवर झालेल्या अमानुष अत्याचारामुळे हा दिवस साजरा न करता त्यादिवशी निमाणी बसस्थानक पंचवटी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे . तसेच आता मुंबईत झालेल्या पावसाळी अधिवेशनात आपल्या समाजावर निराशाजनक वातावरण निर्माण झाले असून आता पुढच्या हिवाळी अधिवेशनात आपली बाजू कशी मांडायची या साठी आपण नाशिक मधून पत्रकार परिषद घेऊन तेच सोशल मीडियाच्या साहाय्याने नॅशनल न्यूज चॅनेलवर आणि सर्व प्रकारच्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहणे आणि झोपलेल्या शासनाला पत्रकारांच्या माध्यमातून जागे करण्यासाठी आपण प्रयत्न करू असा निर्धार करण्यात आला. या प्रसंगी संजय शिंदे, युवराज सैंदाणे, किसन सोनवणे, नितीन शेवरे, सुरेश नवसारे, गणेश राजकोर आणि समाज बांधव उपस्थित होते.
