उनपदेव अंगणवाडी सेविकेची मुजोरी..पोषण आहारा विना मुले.. चौकशी करून कडक कारवाई करा आदिवासी रहिवाशांची मागणी
चोपडा दि.४(प्रतिनिधी): तालुक्यातील उनपदेव येथील अंगणवाडी सेविका खियाली रामचंद्र बारेला ह्या अंगणवाडीतील मुलांना पोषण आहार न देता गावात राकारणात भाग घेवून भानगडी लावीत असल्याबाबतची लेखी तक्रार पाड्यावरील रहिवाशांनी दिली असून ताबडतोब चौकशी करून कडक कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली आहे. तक्रारीची प्रत आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी, जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी चोपडा यांनाही दिली आहे.
तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, उनपदेव गावातील शरभंग पाडयात अंगणवाडी असून त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका म्हणून खियाली रामचंद्र बारेला ह्या कार्यरत आहेत. सदर अंगणवाडी सेविका या अंगणवाडीत येणाऱ्या मुला-मुलींना शासनाने निर्देशित केलेला आहार देत नाहीत. सदर आहाराचे त्या पूर्ण वितरण करीत नसून स्वतःच्या फायद्यासाठी वस्तु वापरतात आणि आदिवासी पाड्यातील गरीब लोकांना विक्री करीत असतात. यापूर्वी ग्रामस्थांनी त्यांना समज देवून असे प्रकार करू नये असे समजावले होते व त्यांनी असे प्रकार पुन्हा करणार नाही अशी कबुलायत दिली होती.परंतु ही सेविका कोणालाही न जुमानता अंगणवाडीतील आहाराचे साहित्य सर्रास विक्री करीत आहे. तसेच गावात आदिवासी पाड्यात राजकारणात भाग घेवून भांडण लावण्याचा प्रकारही करीत आहे. मुलांना आहार पूर्ण पणे देत नसून धीटपणे वागत आहे तरी सदरील अंगणवाडी सेविका खियाली रामचंद्र बारेला हीची कसून चौकशी करून दोषी आढळल्यास सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अथवा अन्यत्र बदली करण्यात यावी अशी मागणी गावातीलआदिवासी व्यक्तींनी केली आहे.
या तक्रार अर्जावर भाया हलऱ्या पावरा, शेंड्या बहादुर पावरा,
रेवादी गोपाल पावरा, कालुसिंग रामसिंग पावरा ,रामसिंम गुज्या पावरा ,सोनी शेंडया पावरा,मुकेश लक्ष्मीण पावरा ,रेखा मुकेश पावरा ,रतीलाल लखा पावरा,बायसि रतीलाल पावरा,देवसिंग जामसिंग पावरा, समरा देवसिंग पावरा , बशा फकऱ्या पावरा,
निमला बशा पावरा, ढेकडी बाई रामसिंग पावरा- रामसिंम हलऱ्या पावरा, शेवला मालसिंग बारेला, बटा रायसिंग पावरा, मनि बटा पावर, गजीराम बगऱ्या पावरा, लता गजीराम पावरा ,जगन अरसिंग बारेला, दुलारकीबाई जगन बारेला, गाठ्या फुलज्या बारेला ,बानुबाई गाठ्या बारेला, राकेश जगन बारेला ,जमुना राकेश बारेला, सुनिल गाठ्या बारेला , लता सुनिल बारेला, नरसिंग वेरसिंग बारेला, सायना नरसिंग बारेला, रमेश दिलदार बारेला यांच्या सह ४० ते ५० जणांच्या सह्या आहेत.





