आदिवासी विकास मंत्री यांच्या गाडी ताफ्याला काळे झेंडे दाखवून आदिवासी कोळी समाजाकडून निषेध

आदिवासी विकास मंत्री यांच्या गाडी ताफ्याला काळे झेंडे दाखवून आदिवासी कोळी समाजाकडून निषेध 

शिरपूर दि.२१(प्रतिनिधी)आदिवासी कोळी जमातीवर वर्षानुवर्षे होणाऱ्या  अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व आदिवासी टोकरे कोळी,मल्हार कोळी, महादेव कोळी,डोंगर कोळी आदी जमितीवर आदिवासी विकास मंत्री सुडबुद्धीने अन्याय करत आहे..ह्या अन्यायाचा उद्रेक म्हणून आदिवासी विकास मंत्री यांच्या ताफ्याला शिरपुर शहरातील आशीर्वाद बस स्टॉप जवळ शिरपूर शहर व तालुक्यातील आदिवासी कोळी जमात बांधवांनी काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला..

यावेळी आदिवासी विकास मंत्री यांना काळे  झेंडे दाखविंतांना हिराभाऊ वाकडे, वाल्मिक कोळी, नागेश कोळी, किरण कोळी आदी आदिवासी कोळी जमात बांधवांना शिरपुर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले व शिरपुर शहर पोलिस स्टेशनला आणत आंदोलकांनावर कायदेशीर फॉर्मीलीटी पुर्ण करत रात्री उशीरा सोडण्यात आले ...         

 यावेळी आंदोलकांना शिरपुर पोलिस स्टेशनला सोडविण्यासाठी आलेला जमात बांधव ..  मनोहरदादा वाघ,लोटनभाऊ शिरसाठ,किशोरभाऊ शिरसाठ,नितीनभाऊ अखडमल, दिनेश कोळी, दिपक सोनवणे,निलेशभाऊ कोळी, गोलू कोळी,गणेश कोळी, राहुल सोनवणे,सोनु कोळी, गणेश सोनवणे,अविनाश कोळी, नितीन सावळे,अकाश कोळी,शुभम जव्हेरी, भुषण कोळी, योगेश कोळी,किरण कोळी,बबन जव्हेरी,समाधान कोळी व जमात बांधव उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने