भारतीय जैन संघटनेतर्फे अनेर डॅम येथे आदिवासी विद्यार्थ्यांना वह्या वाटप

 भारतीय जैन संघटनेतर्फे अनेर डॅम येथे आदिवासी विद्यार्थ्यांना वह्या वाटप

 चोपडा दि.२(प्रतिनिधी) --- भारतीय जैन संघटना शाखा चोपडाच्या वतीने अनेर डॅम येथील आदिवासी विद्यार्थ्यांना वह्या वाटप दि.३१ रोजी करण्यात आल्या. जवळपास पाचशे तर सहाशे विद्यार्थ्यांना वही वाटप करण्यात आली 

भारतीय जैन संघटना दरवर्षी शैक्षणिक साहित्य विविध शाळांमध्ये जाऊन वाटप करत असते यावर्षी देखील सालाबादाप्रमाणे वह्या वाटप करण्याच्या मानस अनेक दिवसापासून होता आदिवासी विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी अनेर डॅम येथील महादेव आदिवासी प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा अनेर डॅम तालुका शिरपूर येथेप्रत्यक्षात जाऊन विद्यार्थ्यांना हातात वह्या वाटप करण्यात आल्या.

 यावेळी भारतीय जैन संघटनेचे चोपडा शाखेचे अध्यक्ष निर्मल बोरा,सचिव गौरव जैन ,विभागीय उपाध्यक्ष लतिष जैन, दर्शन जैन, राहुल जैन, कुशल जैन, तसेच रोटरी क्लब चे अध्यक्ष व भारतीय जैन संघटनेचे सदस्य चेतन टाटिया आदी उपस्थित होते यावेळी अनेर डॅम शाळेचे मुख्याध्यापक एस एन बोरसे , डी एम पाटील के एस माळी, ए एच पाटील, एस एल मनुरे, ए एस पाटील, डी आर गोसावी, वी आर चौधरी, व्ही पी पाटील, सर्व शिक्षक उपस्थित होते सूत्रसंचालन डी एम पाटील यांनी केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने