चोपड्यात अट्टल लुटारुंचे थैमान .. पोलिस तपास शून्य .. खिडकीच्या लोखंडी गज कापून तीन लाखांचा ऐवज लूट.. रामकुवर नगरातील घटना.. लोकांमध्ये भितीचे सावट कायम..
चोपडा,दि.२२ (प्रतिनिधी).. चोपडा शहरात चोरीचे सत्र सुरूच असून शहरातील धनवाडी रस्त्या लगत असलेल्या रामकुवर नगर भागातील प्लॉट नंबर २३ येथील ज्ञानेश्वर बाबुलाल पाटील यांचा घराच्या मागील खिडकीचे ग्रिल कापून साडेचार तोळे सोने,व ४७ हजार रुपये रोख असा अंदाजे ३लाखाचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले. चार अज्ञात चोरट्यांनी रक्कम घेऊन पळत असताना एका पत्रकाराने बघीतले असल्याचे समजते. .
घरमालकाने आरडा ओरड केले म्हणून चोरट्यांनी घरमालकाचा अंगावर दगड फेक करून चोरटे मुद्देमाल घेऊन पसार झाले. घटना स्थळी प्रभारी पोलिस निरीक्षक कावेरी महादेव कमलाकर ,उपनिरीक्षक अजित सावळे यांनी भेट दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून चोरट्यांनी शहरभर धुमाकूळ घातला असून लोखंडी गज कापून खिडकीच खुळ खुळी करून डाव साधत आहेत.काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद लुटारूंचा व्हिडिओ पोलिसांचे हाती लागूनही शून्य तपासाने लुटारूंना हिंमत वाढली आहे. वरिष्ठ पातळीवरून ताबडतोब दखल घेऊन चोरट्यांच्या नांग्या ठेचण्याची वेळ येऊन ठेपली आहे या धाडशी चोऱ्यांमुळे पुन्हा शहर कॉलनी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .