चोपडा आगाराची स्वच्छ व सुंदर बस स्थानका कडे वाटचाल

 चोपडा आगाराची स्वच्छ  व सुंदर बस स्थानका कडे वाटचाल

चोपडा,दि.३१ (प्रतिनीधी) : राज्य परीवहन महामंडळाच्या जळगाव विभागातील सर्वात मोठ्या आगारांपैकी प्रशस्त आवार ,विक्रमी उत्पन्नाच्या बाबतीत अग्रेसर असलेले चोपडा आगाराच्या परीसरात रोज स्वच्छता राबवुन, निटनेटकेपणाने,कामात सुसूत्रता आल्याने आगाराचा चेहरा मोहरा बदलतांना दिसुन येत आहे. आगाराने केलेल्या उत्कृष्ट कामगीरीच्या आधारावरच गेल्या मे महीन्यात महामंडळाच्या मानांकनात महाराष्ट्रात उत्कृष्ट आगार म्हणुन तिसरा क्रमांक पटकविला आहे.  त्याचप्रमाणे चोपडा आगाराचे आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांचे प्रयत्नाने 2008 नंतर पहिल्यांदाच मे महिन्यात आगार सात लाखांनी नफ्यात आलेला आहे तदनंतर जून महिन्यात नऊ लाखांनी नफ्यात आलेला आहे तसेच यापुढेही आगार नफ्यात राहील यासाठी उपाययोजना करण्यात  येत आहेत.चोपडा आगाराचे आगार व्यवस्थापक महेंद्र लोटन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आगारात ७७ अल्पशा बस असतांना देखील ग्रामिण,मुक्काम,शालेय फेर्यां तसेच लांब पल्याचे नियते यांचे दिवसाला ५१२ फेर्या २६ हजार किलोमीटरचे नियोजन करुन चालक वाहक,अधिकारी व अन्य कर्मचार्यांच्यां कामकाजात सुधारणा करून उत्कृष्ट आगाराकडे वाटचल सुरू केली आहे.तसेच राज्य परीवहन महामंडळा कडुन "हिंदु ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक"अभियान राबविण्यात येत असल्याने त्या अनुषंंगाने आगार प्रमुख महेंद्र पाटील यांच्या अथक परिश्रमाने व मार्गदर्शनाने आगारासह कार्यशाळा व भिंतींना रंगरंगोटी करुन दिशादर्शक,वेळापत्रक/ फलके नव्याने लावुन संपुर्ण परीसरात फुल झाडे,वृक्षारोपण करुन फुलझाड्यांच्या कुंडीने आगार सजवुन रोज स्वच्छता राबवुन देखभाल केली जात आहे.तर आगारात तयार केलेले सेल्फी पाईंट विद्यार्थी व प्रवाश्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरत आहे. तसेच विविध सामाजीक संस्थेच्या मदतीने आगाराच्या सौदर्यात भर घालण्यासाठी पोर्टेट उतरवुन व सजवुन सुशोभिकरणाचे काम प्रगती पथावर करण्यात येत असल्याने स्वच्छ व सुंदर बस स्थानकाकडे वाटचाल करताना दिसुन येत आहे.आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी केलेला आमूलाग्र बदलाचे सर्वत्र कौतुक होतांना दिसून येत आहे. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने