उद्या चोपडा येथे 'क्रांति से हरितक्रांति ' हिंदी नाटक

 उद्या चोपडा येथे 'क्रांति से हरितक्रांति ' हिंदी नाटक




 चोपडा,दि.२७ (प्रतिनिधी)स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र सरकारच्या  संस्कृती  मंत्रालय , नवी दिल्ली आयोजित भारतीय क्रांतिकारक व कृषि वैज्ञानिक डॉ . पांडुरंग खानखोजे यांच्या जीवन चरित्रावर आधारित लेखिका / निर्देशिका मंगला सानप ( राष्ट्रीय नाट्य विद्यालय , नवी दिल्ली ) निर्देशीत व मेराकी परफॉर्मिंग आर्टस् ऑर्ग नायझेशन, नागपूर प्रस्तुत ' द अनसंग हिरो : डॉ खानखोजे - द ब्रेड ऑफ लाईफ 'अर्थात 'क्रांति से हरितक्रांति ' हे हिंदी नाटक दि . २८ जुलै २०२३ शुक्रवार रात्री ८ -०० वाजता कै .नाम.आक्कासो . शरश्चंद्रिका सुरेश पाटील न. प. नाट्यगृहात संपन्न होणार आहे .

 मुख्या.श्री. हेमंत निकम, नगर परिषद चोपडा यांच्या विशेष सहकार्यातून महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चोपडा,रोटरी क्लब ऑफ चोपडा,राष्ट्रभाषा हिंदी अध्यापक मंडळ चोपडा यांनी या नाटकाचे आयोजन केले आहे . मोफत मर्यादित प्रवेश असलेल्या या नाटकाच्या प्रवेशिकांसाठी नाटयप्रेमी रसिकांनी  १) रोटरी प्रेसिडेंट चेतन टाटिया - आनंद सुपर शॉपी न.प. बगिच्या जवळ, २) ए .पी .पाटील - यशोदाई फोटो स्टुडिओ नाट्यगृहा शेजारी ३ ) मसाप कार्याध्यक्ष विलास पाटील c/o शांताई क्लिनिक डॉ . आंबेडकर पुतळ्या जवळ ४ ) रोटरी सचिव अर्पित अग्रवाल - अग्रवाल प्रोव्हिजन, पंकज शाळे समोर पंकज नगर येथे किंवा विलास पाटील ९८ २२ ८० १५ ९४या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने