चोपडा कॉलेज विद्यार्थीनींना द्वितीय पुरस्काराचे पारितोषिक प्राप्त

 चोपडा कॉलेज विद्यार्थीनींना  द्वितीय पुरस्काराचे पारितोषिक प्राप्त


चोपडा,दि.१५(प्रतिनिधी): सन 1992 मध्ये महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलीत औषधनिर्माणशास्र महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी दरवर्षी प्राचार्य डॉ. गौतम पी वडनेरे यांच्या मार्गदर्शनाखाली *वर्षग्रंथ* या नावाने महाविद्यालयाचे नियतकालिक छापण्यात येते. महाविद्यालयाच्या वर्षग्रंथ -2021-2022 या नियतकालिकेतील मराठी कविता " पेट्रोल म्हणाले कांद्याला " यासाठी किर्ती राजेंद्र नेवे द्वितीय वर्ष विद्यार्थीनी हिला व हिंदी लेख " लक्ष्य निर्धारित कैसै करे" यासाठी स्वाती तुरखडे द्वितीय वर्ष विद्यार्थीनी या दोघाना बहीणाबाई चौधरी  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आयोजीत नियतकालिक स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळालेले आहे. महाविद्यालयात दिनांक 14 जून  2023 रोजी किर्ती नेवे व स्वाती तुरखडे या विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट संदीप सुरेश पाटिल व सचिव डॉ. स्मिताताई संदीप पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्याअध्यक्षीय मनोगताद्वारे संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट संदीप सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक व अभिनंदन केले. प्राचार्य डॉ. गौतम पी वडनेरे यांनी महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व प्रगतीसाठी सदैव केंद्रीत आहे व त्याप्रमाणे त्यानां वेळोवेळी शिक्षकांकडून मार्गदर्शन लाभते असे  सांगितले. विभागप्रमुख.डॉ. भरत व्हि.जैन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 

कार्यक्रमास प्राचार्य डॉ. गौतम पी वडनेरे,  मुख्य संपादिका प्रा.डॉ. सुवर्णलता एस. महाजन व संपादकीय सदस्य व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. आशाताई पाटिल, महाविद्यालयाचे प्रबंधक श्री प्रफुल्ल मोरे, सर्व  शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व संपादकीय टिम या सर्वानी विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने