पंकज विद्यालयात विद्यार्थी प्रवेशोत्सव उत्साहात

 पंकज विद्यालयात विद्यार्थी प्रवेशोत्सव उत्साहात



चोपडा दि.15(प्रतिनिधी)- विद्यार्थी शाळेचा पहिला दिवस निमित्ताने पंकज विद्यालयात प्रवेश उत्सव आयोजन करण्यात आले याप्रसंगी मा भावना भोसले गट शिक्षण अधिकारी चोपडा व संस्था उपाध्यक्ष अविनाश राणे, मुख्याध्यापक एम व्ही पाटील यांच्या हस्ते विद्यार्थी मित्रांचे व पालकांचे प्रवेशद्वारा जवळ गुलाब पुष्प व पेन्सिल भेट देऊन स्वागत करण्यात आले. नंतर संगीत तालावर आनंदाने विद्यार्थ्याना सभागृहात आणले सरस्वती प्रतिमा पूजन करुन नविन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ करण्यात आला. 

प्रमुख अतिथी यानी विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या शासनातर्फे प्राप्त पुस्तके विद्यार्थ्याना मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली शापोआ अंतर्गत विद्यार्थ्याना मिष्ठान्न (सोनपापडी) वितरण करण्यात आले शालेय परिसर सुशोभित करण्यात आला होता विद्यार्थी व शिक्षक वृंद आनंदी होते सभागृहात विद्यार्थ्या साठी आनंददायी परिपाठ आयोजित करण्यात आला सदर उपक्रमासाठी सर्व शिक्षक वृंद कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने