नाशिकला आम आदमी पार्टीची निवडणुक रणनिती बैठक
नाशिक दि.३० (प्रतिनिधी) आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी गोपाल इटालिया यांच्या मार्गदर्शनात पश्चिम महाराष्ट्रात स्वराज्य यात्रा संपन्न झाली,या यात्रेत संपुर्ण महाराष्ट्रातून जवळपास 5000 कार्यकर्ते समाविष्ट झाले होते, एकादशीच्या मुहूर्तावर पंढरपूरच्या विठोबा रखुमाईचे दर्शन घेऊन, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर नवीन महाराष्ट्र घडवण्यासाठी "पंढरपूर ते रायगड" असा"स्वराज्य"यात्रेचा प्रवास होता.
स्वराज यात्रा एकूण १० दिवस पंढरपूर ते रायगड असा एकूण ७८० किलोमीटर प्रवास करणार असून, यात्रा पश्चिम महाराष्ट्रातील ५ व कोकणातील २ जिल्हे, एकूण ११ लोकसभा व ६० पेक्षा जास्त विधानसभा मतदार संघातून मार्गक्रमण करत गेली होती, ही यात्रा संपल्यानंतर आम आदमी पार्टीने लगेचच संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात आणि गावात स्वराज संवादाचे राज्य उपक्रम राबविलेत.
नाशिकमधील द्वारका येथील साई प्रितम हॉटेल येतील सभागृहात महाराष्ट्र प्रभारी गोपाल ईटालिया आणि सुरत लोकसभा अध्यक्ष रजनीकांत वाघांनी यांच्या उपस्थितीत येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, महानगरपलिका आणि ईतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात रणनिती आखली गेली.
येणाऱ्या काळात दिल्ली आणि पंजाब मधील लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी महाराष्ट्रात आप काम करेल अशी माहिती गोपाल ईटालिया यांनी दिली.
बैठकीत धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक येतील अध्यक्ष, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्यावेळी सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजनही करण्यात आले होते, या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक "आप" ने केले होते