श्रीमती. शरदचंद्रिका पाटील फार्मसीत कॉलेजात योगा दिवस साजरा

 

श्रीमती. शरदचंद्रिका पाटील  फार्मसीत कॉलेजात योगा दिवस साजरा 

चोपडा दि.२१( प्रतिनिधी) आज दिनांक 21 जून 2023 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त श्रीमती. शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसीने योगदिवस जोश आणि उत्साहाने साजरा केला.

या वर्षी, आंतरराष्ट्रीय योग दिन 2023 ची थीम 'वसुधैव कुटुंबकमसाठी योग' आहे, जी 'एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य' या आमच्या सामूहिक आकांक्षेला प्रभावीपणे समाविष्ट करते.

संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट भैयासाहेब संदीप सुरेश पाटिल व सचिव डॉ. स्मिताताई संदीप पाटील यांच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगताद्वारे संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट भैयासाहेब संदीप सुरेश पाटील यांनी यशस्वी कार्यक्रमानिमित्त अभिनंदन केले.

 प्राचार्य डॉ. गौतम पी वडनेरे यांनी महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व प्रगतीसाठी सदैव केंद्रीत आहे. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, असे म्हणता येईल.योग करण्यासाठी कोणत्याही प्रकारची साधन सामुग्रीची आवश्यकता नसते. सहज, सोपा कुठेही, कधीही करता येण्याजोगा व्यायाम म्हणजे योगा होय.

योग साधनेमुळे शरीर व मन स्वास्थ्य लाभते यामुळेच आज जगभरात योगाचे महत्त्व वाढत आहे. जगभरातील विविध देशांमध्ये योगा दिन साजरा केला जातोय. आणि भारत हे याचे प्रमुख केंद्र मानले जात आहे.आपल्या दैनंदिन जीवनशैलीत योगासने खूप महत्त्वाची भूमिका बजावते. प्राचार्य डॉ. गौतम पी वडनेरे  यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रबंधक श्री प्रफुल्ल मोरे, सर्व विभाग प्रमुख ,अतुल साबे सर, शैक्षणिक प्रभारी श्री. तुषार पाटील,  श्री. तन्वीर शेख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने