फादर्स डे निमित्त निवृत्त शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड यांचा सत्कार[ डॉ. कलाम पुस्तक भिशीचाप्रेरणादायी सामाजिक उपक्रम ]

 फादर्स डे निमित्त निवृत्त शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड यांचा सत्कार[ डॉ. कलाम पुस्तक भिशीचाप्रेरणादायी सामाजिक उपक्रम ]

   जळगाव दि.२१(प्रतिनिधी): भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव तर्फे निवृत्त प्राथमिक शिक्षणाधिकारी निळकंठराव गायकवाड यांचा ' फादर्स डे ' च्या निमित्ताने भावपूर्ण सत्कार रविवार दि.१८ जून २०२३ रोजी त्यांच्या निवासस्थानी निवृत्त शिक्षण उपसंचालक तथा सुप्रसिद्ध साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन करण्यात आला. 

    प्राथमिक शिक्षकांतील साहित्यिक आणि उपक्रमशील शिक्षकांचे संघटन होऊन त्यांच्या हातून समाजाभिमुख शैक्षणिक उपक्रम व्हावे यासाठी सातत्याने प्रेरणा व कृतिशील प्रोत्साहन आणि निरंतर मार्गदर्शन करणे हा नीळकंठ गायकवाड अप्पांचा स्थायिभाव आहे .या प्रसंगी  शशिकांत हिंगोणेकर लिखित ' युद्ध सुरु आहे ' हा काव्यसंग्रह निळकंठ गायकवाड यांना विजय लुल्हे यांनी पुस्तक भिशी तर्फे सादर भेट दिला.प्रारंभी सुकन्या माई तथा सुषमा गायकवाड - पाटील यांनी पिताश्री गायकवाड अप्पा तसेच साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांचे कुंकूम तिलक व औक्षण करून पेढा भरविला आणि जन्मदात्याला तसेच पितृतुल्य हिंगोणेकर साहेबांना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही निर्मिकाला प्रार्थना केली.तसेच चरणस्पर्श करीत शुभाशिर्वाद घेतले.ग.स.सोसायटीचे संचालक मनोज माळी यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ व स्वामी विवेकानंद लिखित ग्रंथ देऊन साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी ग्रेडेड मुख्याध्यापक तथा ह.भ.प.मनोहर खोंडे व राजकुमार गवळी,विजय लुल्हे ,चित्रकार सुनील दाभाडे उपस्थित होते.

निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर यांचा भावपूर्ण सत्कार शाल,श्रीफळ देऊन विजय लुल्हे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी ह.भ.प.मनोहर खोंडे यांनी नेतकर साहेबांना भेटवस्तू सादर भेट दिली.

********************** पूज्य पिताश्री निवृत्त मुख्याध्यापक सुपडू सुतार यांचे कोविड कालावधीत निधन झाल्याने विजय लुल्हे यांचे पितृछत्र क्रूर काळाने हिरावून घेतले.विविध क्षेत्रातील ज्या पितृतुल्य महानुभवांनी कुटुंबाप्रमाणेच समाजोन्नतीसाठी नि:स्वार्थीपणे योगदान दिले.युवकांना जीवनमूल्यांचे धडे दिले व महिला भगिनींच्या अन्याय निवारणार्थ झटले ... या समर्पणशील योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करावी.ऋणानुबंध दृढ व्हावेत. म्हणून पितृतुल्य मान्यवरांचा  आशीर्वाद घेऊन चैतन्य व ऊर्जा मिळवून नव्या उमेदीने निरंतर समाजसेवा करावी या विशुद्ध हेतूने ' फादर्स डे ' निमित्ताने सत्काराचे आयोजन करण्यात आल्याचे पुस्तक भिशी संस्थापक जिल्हा प्रमुख विजय लुल्हे यांनी विनम्रपणे सांगितले.यापुढे हा उपक्रम निरंतर अनौपचारीक साजरा करण्याचा दृढ संकल्प यावेळी लुल्हे यांनी जाहिर केला. 

******************** अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते महेश शिंपी यांचे वयोवृद्ध पिताश्री वसंत शिंपी ( ८६ वर्षे ) यांना बुके देऊन विजय लुल्हे यांनी निरोगी दिर्घायुष्याच्या शुभेच्छा देत आशिर्वाद घेतले.याप्रसंगी बाबांच्या स्नुषा शिक्षिका सौ.पल्लवी शिंपी,सुपुत्र महेश शिंपी सर,नातवंडे नील शिंपी व ईश शिंपी उपस्थित होते.श्री विश्वकर्मामय पांचाळ सहाय्यक मंडळ जळगाव संस्थेचे सचिव एम.टी.लुले यांचा शाल,श्रीफळ देऊन विजय लुल्हे यांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला तत्पूर्वी एम.टी.लुले यांचे सुपूत्र किरण लुल्हे यांनी पिताश्रींचे कुंकूम तिलक करून औक्षण केले.त्यानंतर सर्वांनी नतमस्तक होऊन लुले बाबांचे शुभाशिर्वाद घेतले.याप्रसंगी गोपाळ उगवे,भुपेंद्र उगवे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने