पाहूनी लोक नेत्याला कार्यकर्ते झाले मायेच्या ओलाव्याने चिंब..हेच आमदारांच्या कार्याचे खरे प्रतिबिंब ..चोपड्याचे सुपरफास्ट विकास नेते प्रा.चंद्रकांत अण्णांच्या घरावर तोबा गर्दी
चोपडा दि.१७(प्रतिनिधी) चोपडा मतदार संघाच्या कामाला मिळालेला विसावा पाहता जनता अस्वस्थ झाली आहे त्याला कारणही तसेच आहे ते म्हणजे आमदार दाम्पत्यांच्या चारचाकीला झालेला अपघात.तालुक्यात विकास कामांचा सपाटा दे दणादण अखंड पणे सुरू असतांना अपघातामुळे तात्पुरता मिळालेला थांबा आणि अण्णासाहेबांविषयी असलेली स्नेहाची गोडीची चव चाखता येत नसल्याने अस्वस्थ झालेला कार्यकर्ता थेट आदर्श निवास गाठून तोबा गर्दी करुन आमदार सोनवणे दाम्पत्यांच्या तब्येतीची विचारपूस करु लागले आहेत.कार्यकत्यांचा गराडा पाहून घराला यात्रेच स्वरूप आलेले आहे. रंजल्या गांजलेल्यांची सेवा अन् गावा गावा चा विकास हेच यामागचे कारण आहे.त्यामुळे ऐसा आमदार होणे नाही असाच टाहो प्रत्येकाच्या तोंडून फुटत आहे.काल नुकतेच लासुर परिसरातील तमाम कार्यकर्त्यांनी जळगावी हजेरी लावत आमदार सौ.लताताई सोनवणे व माजी आमदार अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे विचारपूस करत आनंदाश्रुंना वाट मोकळी केली आहे.अण्णासाहेबांशी गळा भेट झाल्याने अनेकांच्या छाती भरून आल्याने आपणास जिवाभावाचा परिवार मिळविल्याचा अभिमान आमदार दाम्पत्यास यावेळी झाला आहे.
कार्यसम्राट माजी आमदार आण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे व तालुक्याचे भाग्यविधाते आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांचा करंज जवळ अपघात झाला असता त्यांना फारमोठी दुखापत मुकामार लागला होता त्या दिवशापासुन आण्णासाहेबांचा व ताईसांहेबाचा तालुक्यातील कार्यकर्तेचा संवाद झाला नव्हता म्हणून लासुर येथील सर्व स्तरातील कार्यकर्त्यांनी आण्णासाहेबांना भेटण्यासाठी जळगाव येथे निवासस्थानी भेट घेवुन आण्णासांहेबाची व ताईसांहेबाची तब्बेतीची विचारपुस करतांना उपरोक्त मायेच्या ओलाव्याचे दृश्य दृष्टीस पडले. . याप्रसंगी लासुर नगरीचे शिवसेनेचे नेते ए.के गंभीर सर (संजय गांधी निराधार समिती सदस्य ),कैलास जी बाविस्कर (तालुका समन्वय पुनविॕलोकन समिती सदस्य ),सुरेश महाजन (चेअरमन वि.का.सो.लासुर), अजयभाऊ पालीवाल (माजी उपाध्यश किसान प्रसारक मंडळ लासुर), शकीलअली शहा (माजी संरपच लासुर ),किशोर माळीसर ,शाहरुख खाटीक, रामचंद्र बारेला, सुरेश महाजन, वासुदेव महाजन सर्व ग्रामपंचायत सदस्य देवीदास मगरे गटप्रमुख लासुर ,नौमील पटेलिया (संचालक वि.का.सो.मा.),पिताराम पावरा आदीवाशी नेते, सलीमभाऊ व्यापारी मंहमद पटेल ,शरीफ शेख, रिआन खाटीक तौसीफ ठोके ,लासुर मुस्लिम पंच कमेटी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते .