उद्योजक संजय जैन यांची भारतीय रेल्वेच्या विभागीय कमिटीवर सल्लागार म्हणून निवड

 उद्योजक संजय जैन यांची भारतीय रेल्वेच्या विभागीय कमिटीवर सल्लागार म्हणून निवड


चोपडा दि.१५( प्रतिनिधी ) - तालुक्यातील घोडगाव ही जन्मभूमी असलेले आणि पुणे येथील बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक ऍड.संजय जैन यांच्या विविध कार्याची दखल घेत त्यांची नुकतीच भारतीय रेल्वेच्या विभागीय कमिटीवर सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे.

संजय जैन यांचे बांधकाम व्यवसायासह  सहकार,सामाजीक,शैक्षणिक,सांस्कृतिक,राजकीय,धार्मिक,क्षेत्रात आजवर उल्लेखनीय काम राहीले आहे,चोपडा शेतकरी सहकारी सुतगिरणीचे व्हा.चेअरमन,ग्रामीण विकास बँकेचे अध्यक्ष,आनंदऋषी गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष,वर्धमान श्रावक संघ चिंचवडचे महामंत्री,जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष,अशा अनेक संस्थांच्या पदांवर राहून त्यांनी आपल्या कार्याची छाप सोडली आहे,यासोबतच धार्मिक कार्यासाठी दानशूर व्यक्तिमत्व म्हणूनही त्यांची ख्याती आहे.

चोपडा तालुक्यातील राजकारणात ते अजूनही सक्रिय असून सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे सौहार्द पूर्ण संबंध आहेत,शब्दाला वजन आहे.भारतीय रेल्वेच्या विभागीय कमिटीवर सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती झाली असून तीन राज्यांची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे.यानिवडी बद्दल चोपडा तालुक्यातून अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे,तर संजय जैन मित्र मंडळाच्या वतीने लवकरच भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने