खाजगिकरणातून भांडवलशाही उदयास येते व ती लोकशाहीस उध्वस्त करते : जयसिंग वाघ

 खाजगिकरणातून भांडवलशाही उदयास येते व ती लोकशाहीस उध्वस्त करते : जयसिंग वाघ 

--- -------------------------------------------------- 

धुळे दि.१५(प्रतिनिधी):-  आज भारतात बहुतांश शासकीय , निमशासकीय संस्था खुलेआम भांडवलदारांच्या  घश्यात टाकल्या जात आहेत , भंडवालदार मोठ्यप्रमाणात आर्थिक दिवाळखोरी जाहिर करतो व सरकार त्यांचे कर्ज माफ करते  , सरकार देशात प्रचंड आर्थिक विषमता निर्माण करुण देशात भांडवलशाही आणू पाहत आहे मात्र भांडवलशाही मुळे लोकशाही उध्वस्त होते असे विवेचन प्रसिद्ध साहित्तीक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले .,

        धुळे येथील राजेंद्र छात्रालय येथे  ' नवी आव्हाने नवे पर्याय ' विषई उत्तरमहाराष्ट्र स्तरीय कार्यकर्ता  परिषद १४ मे रोजी घेण्यात आली असता त्यात वाघ मार्गदर्शन करत होते .

          जयसिंग वाघ यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितले की , आज पुरोगामी संघटना विविध आव्हानांबद्दल बोलते , पण सर्वच पुरोगामी संघटनांना फुटिची जी किड लागली आहे हेच तिच्यापुढं मोठे आव्हान आहे हे त्यांनी विविध उदाहरण देऊन स्पष्ट केले , आपल्या फूटीमुळेच खरे तर लोकशाही , संविधान धोक्यात आले आहे . आज कांग्रेस पक्ष सुद्धा आर .एस.एस. च्या अजेंड्या प्रमाणे वागत आहे , जनतेला प्रखर हिंदुत्व पाहिजे असेल तर भाजपा व मवाळ हिंदुत्व हवे असेल तर कोंग्रेस सत्येत बसविले जाईल व हे काम इथला मतदार नाही तर आरएसएस करेल या दोन पक्षांशिवाय तीसरा पक्ष भारतात राहणार नाही असेही वाघ यांनी सांगितले . आज सरकारी शाळा बंद करणे , कमितकमी मूलं शिक्षण घेतील व ते जास्तीत जास्त अंधश्रद्ध राहतील अशी योजना राबविली जात आहे , शिक्षण , स्पर्धा परीक्षा तुमची बुद्धिमत्ता याला काहीच कींमत राहणार नाही तर फक्त राबणारे हात म्हणून आपल्याला राबविले जाईल असेही जयसिंग वाघ म्हणाले .

        परिषदेचे मुख्य संयोजक व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी पक्षीय व निवडणूकीच्या राजकारनापासुन अलिप्त पण आपले राजकीय मत व भूमिका घेऊन कार्यरत राहणाऱ्या सर्व प्रागतिक विचारांच्या संघटनांची ' नवी आव्हाने नवे पर्याय ' या नावाने एक प्रक्रिया राबविली जात आहे . या प्रक्रियेचे उद्दिष्ट २०२४ मध्ये भाजपा ला पराभूत करणे आहे . त्याच बरोबर देशातील वातावरण संविधानमय करणे , लोकशाही , समाजवाद , बंधुता , धर्मनिरपेक्षता , सांस्कृतिक विविधता , ससमजिक न्याय या तत्वाची पुनर्स्थापना करणे हे आहे . या अनुशंगाने जुलै २०२३ मध्ये राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे . अशी माहिती त्यांनी दिली .

      प्रसिद्ध कवी व आदिवासी नेते वाहरु सोनवणे यांनी देशभरात सर्वच वर्गीयांची पिळवणुक सुरु असून विविध प्रकारचे अन्याय , अत्याचार पाहता भारतात लोकशाही आहे की नाही अशी शंका येते असे प्रतिपादन केले .

       राष्ट्र सेवा दलाचे प्रदेश अध्यक्ष अर्जुन कोकाटे यांनी विविध पुरोगामी विचारांच्या संघटनांची एकजुट करुन  ग्रामीण भागातील जातीयता , धर्मान्धता , जातीय द्वेष , धार्मिक द्वेष या विरुद्ध काम करणे आवश्यक आहे असे मत मांडून सर्व पुरोगामी संघटनांची एक संघटना ऊभी करावी असे आवाहन केले .

         प्रसिद्ध समाजवादी नेत्या रंजनाताई कान्हेरे यांनी आज मतदार मोठ्या प्रमाणात संभ्रमित झाला असून त्याला लोकशाही , संविधान समजून सांगावे लागेल . देशात आज प्रचंट महागाई , बेरोजगारी वाढत असून आर्थिक मागासलेपण वाढत आहे या प्रश्नि  जनतेला संघर्षरत करावे लागेल , एक सामयिक कार्यक्रम आखून सर्वानि एकत्रित काम करावे असे मत व्यक्त केले .

       रंजना गवादे , मुकुंद दीक्षित , वासंती दिघे , सुधाकर बडगुजर , चंद्रसिंग बरडे , बारकु पाटील , दादाभाई पिंगळे , सुभाष काकुसते , मधुकर शिरसाठ , रामदास जगताप यांनी मनोगत व्यक्त केले .

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश पाटील तर आभार सतीष सुर्वे यांनी केले . परिषदेस जळगाव , धुळे , नंदुरबार , नाशिक , अहमदनगर या जिल्ह्यातुन विविध संघटनांचे प्रतिनिधि , कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते . कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत झाले .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने