चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी सेनेचे नरेंद्र पाटील व उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे विनायकराव चव्हाण बिनविरोध
*चोपडा दि.२४(प्रतिनिधी)* चोपडा कृषि उत्पन्न बाजार समिति चेअरमन पदाच्या निवडणुकीत माजी आमदार कार्य सम्राट प्रा.श्री चंद्रकांत जी सोनवणे यांचे कट्टर समर्थक श्री नरेंद्र वसंतराव पाटिल हे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे विनायकराव रामदास चव्हाण हे बिनविरोध निवडून आले आहेत. शेतकरी विकास पॅनलचा सभापती तीन वर्षे तर बळीराजा सहकाराच्या वाट्याला २ वर्षे कालावधी देण्यात आला आहे.त्यातही विशेष म्हणजे पहिले दीड वर्षे आणि शेवटचे दीड वर्षे सेना भाजप प्रणित गटाला तर मध्य वर्षाचा कालावधी राष्ट्रवादी काँग्रेस चे बळीराजा सहकार पॅनलला देण्याचे वाटाघाटीत ठरविण्यात येऊन एकमत झाल्याने सभापती व उपसभापती बिनविरोध झाले आहेत.खासकरून सर्व मतभेद विसरून सर्वपक्षीय नेते एकत्र आल्याचे चित्र प्रथमच पाहावयास मिळाल्याने बाजार समितीचा कारभार वेगाने धावण्याचा संकेत मिळाले आहेत.
या निवडणुकीत सभापती पदासाठी सेनेचे नरेंद्र वसंत पाटील, कॉग्रेसचे नंदकिशोर सांगोरे, डॉ.अनिल रामदास पाटील यांनी नामांकन दाखल केले त्यातील अन्य दोघांनी माघार घेतल्याने नरेंद्र पाटील यांची सभापती पदासाठी वर्णी लागली.तर उपसभापती पदासाठी डॉ.विक्की उर्फ मनोज सनेर, नंदकिशोर भानुदास पाटील,व विनायकराव चव्हाण यांनी नामांकन दाखल केले.या तिघांपैकी दोघांनी माघार घेतल्याने विनायक चव्हाण यांच्या गळ्यात उपसभापतीपदाची माळ पडली
निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी आमदार चंद्रकांत सोनवणे; जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम भाई अग्रवाल; जिल्हा दूध फेडरेशन चे संचालक रोहित निकम; चोसाका माजी चेअरमन घनश्याम अण्णा पाटील,चहार्डी येथील डॉ. सुरेश शामराव पाटील;
माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराती; माजी आमदार कैलास बापू पाटील, जिल्हा काँग्रेसचे नेते एडवोकेट संदीप भैया पाटील; यावेळी हजर होते. निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयापासून तर विश्रामगृहापर्यंत नवनिर्वाचित सभापती उपसभापती यांची मिरवणूक काढण्यात आली.