पितृछत्र हरपलेल्या मुलींना शैक्षणिक दत्तक घेणारे भास्कर कोळी सरांची सेवानिवृत्ती..

 *पितृछत्र हरपलेल्या मुलींना शैक्षणिक दत्तक घेणारे भास्कर कोळी सरांची सेवानिवृत्ती..


चोपडा दि.२३(प्रतिनिधी):-* येथील कोळी समाजाचे कार्यकर्ते व धरणगाव येथील पी.आर. हायस्कूलचे माध्यमिक शिक्षक भास्कर चिंतामण कोळी (मुळगाव-तरडी, ता.शिरपूर) यांच्या ३१ वर्षे सेवापूर्ती निमित्तचा कार्यक्रम नुकताच चोपडा रिध्दी सिध्दी नगरमधील त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी त्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सपत्नीक यथोचित सत्कार करण्यात आला. भास्कर कोळी सरांनी आपल्या शिक्षकी सेवाकाळात  ज्या मुलींचे पितृछत्र हरपलेले होते अशा चार मुलींना शैक्षणिक दत्तक घेऊन इयत्ता ५ वी पासुन तर इयत्ता १० वी पर्यंतच्या सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या होत्या. गरिबीतून पुढे आलेले भास्कर कोळी सरांनी काबाडकष्ट करून शिक्षण घेतले. खडतर प्रयत्न करून नोकरी मिळवली. सुरुवातीपासूनच त्यांना कलेची आवड होती. गावातील रामलीला कार्यक्रमाचे मुखवटे बनवणे, रंगकाम करणे, पेटी तबला हार्मोनियम यासह गायन सूत्रसंचालन करणे, असा त्यांना छंद होता. परखड स्वभावामुळे अनेकदा त्यांना इतरांचा रोषही पत्कारावा लागे. परंतु निडरपणे त्यांनी आपली शिक्षकी पेशाची वाटचाल सुरूच ठेवली. प्रतिकुल परिस्थितीतुन पुढे आलेले भास्कर कोळी सरांनी आपला परिवार सुसंस्कृत करून नोकरीला लावला. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जळगाव माध्यमिक पतपेढीचे माजी अध्यक्ष आर.एच. बाविस्कर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून संभाजी पाटील, एच.डी. घुगे, रवी चव्हाण, ऍड. संतोष पाटील, राजेंद्र शिरसाठ, चंपालाल पाटील, आर. के. सपकाळे, टी.व्ही. असोदेकर, मोरेसर, परदेशीसर, गायकवाड बंधू, नितीन बडगुजर, टी. एस. कोळी, एन. यु. पाटील, निकम साहेब, रामचंद्र सपकाळे, लखिचंद बाविस्कर, जगन्नाथ बाविस्कर, गोपीचंद बाविस्कर, भरत पाटील यांचेसह त्यांचे स्नेही प्रेमी मित्रमंडळी,महिलामंडळ व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        सूत्रसंचलन ग.स. चे संचालक मंगेश भोईटे व आभार प्रदर्शन कोळीसमाज युवा कार्यकर्ते शुभम सोनवणे यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने